Moti Gemstone Benefits :  या राशीच्या लोकांसाठी मोती आहे शुभ, जाणून घ्या मोती वापरण्याची पद्धत आणि विधी

रत्न शास्त्रानुसार प्रत्येक रत्न कुठल्यातरी ग्रहाचे प्रतिनिधीत्व करतात. जर कुंडलीत कुठलाही ग्रह कमजोर असेल तर रत्न वापरून त्या ग्रहाची स्थिती मजबूत करता येते. आज आपण मोती रत्नाबाबात जाणून घेऊया. मोती रत्नाचा संबंध चंद्र ग्रहाशी आहे.

pearl
मोती  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • रत्न शास्त्रानुसार प्रत्येक रत्न कुठल्यातरी ग्रहाचे प्रतिनिधीत्व करतात.
  • जर कुंडलीत कुठलाही ग्रह कमजोर असेल तर रत्न वापरून त्या ग्रहाची स्थिती मजबूत करता येते.
  • मोती रत्नाचा संबंध चंद्र ग्रहाशी आहे.

Moti Gemstone Benefits : रत्न शास्त्रानुसार प्रत्येक रत्न कुठल्यातरी ग्रहाचे प्रतिनिधीत्व करतात. जर कुंडलीत कुठलाही ग्रह कमजोर असेल तर रत्न वापरून त्या ग्रहाची स्थिती मजबूत करता येते. आज आपण मोती रत्नाबाबात जाणून घेऊया. मोती रत्नाचा संबंध चंद्र ग्रहाशी आहे. मोती कुठल्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर आहे, मोती घालयची काय विधी आहे जाणून घेऊया सविस्तर


असा असतो मोती

रत्न शास्त्रानुसार चंद्राप्रमाणेच मोती हा शांत, सुंदर आणि शीतल असतो. मोतीचा प्रभाव थेट मन आणि शरीरावर पडत असतो. मोती हा गोल आणि पांढरा शुभ्र असतो. समुद्रातील शिंपल्यातून मोती काढले जातात. दक्षिण समुद्रात सापडले जाणारे मोती हे उत्तम दर्जाचे मोती मानले जातात. 


या राशीचे लोक मोती घालू शकतात

रत्न शास्त्रानुसार मेष, कर्क, वृश्चिक आणि मीन राशीचे लोक मोती घालू शकतात. चंद्राची महादशा झाल्यावर मोती घालणे शुभ मानले जाते. जेव्हा चंद्र पाप ग्रहात अडकला असेल तेव्हाही मोती घालण्याचा सल्ला दिला जातो. जर कुंडलीत चंद्र ६,८ किंवा १२ व्या स्थितीत असेल तर तुम्ही मोती घालू शकता. कुंडलीत जर चंद्र कमजोर झाला असेल तर चंद्राची ताकद वाढवण्यासाठी मोती घातला जातो. तसेच कुंडलीत चंद्राची जागा खाली असेल तर मोती न घालण्याचा सल्ला दिला जातो.


मोती घालण्याचे फायदे

ज्योतिष शास्त्रानुसार मोती घातल्यावर लक्ष्मी मातेची कृपा होते. मोती घातल्यामुळे त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारते. जर कुणावर आर्थिक संकट आले असेल तर सफेद मोती घालणे शुभ मानले जाते. ज्या लोकांना खूप राग येतो त्यांनाही मोती घालण्याचा सल्ला दिला जातो. मोती घातल्याने मन स्थिर होतं आणि राग कमी होतो. विद्यार्थ्यांनीही मोती घातल्यास परीक्षेत यश मिळतं.


मोती घालण्याचा विधी

  1. मोती चांदीच्या अगंठीत घालावा आणि ही अंगठी करंगळीत शुक्ल पक्षाच्या सोमवारी रात्री घालावी. कारण रात्री चंद्राची शक्ती वाढते. 
  2. पौर्णिमेच्या दिवशीही मोती घातले जातात.
  3. मोत्याची अंगठी पंचामृतात भिजवून गंगाजलने साफ करून घ्या आणि ही अंगठी बोटात घाला. 
  4. मोतीसह पिवळा पुखराज आणि मूंगाही वापरू शकता, अशा वेळी इतर रत्ने वापरू नका

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी