मकरसंक्रांतीला का उडवले जातात पतंग, मिळतात हे फायदे

धर्म-कर्म-भविष्य
Updated Jan 13, 2021 | 17:05 IST | टाइम्स नाऊ मराठी

भारतात दरवर्षी मकरसंक्रांतीला पतंग उडवले जाातात. देशात अनेक ठिकाणी पतंग उत्सव भरवला जातो. . या दिवशी पतंग उडवण्यामागे केवळ धार्मिक कारणच नव्हे तर वैज्ञानिक कारणही आहे.

kite
मकरसंक्रांतीला का उडवले जातात पतंग, मिळतात हे फायदे 

थोडं पण कामाचं

  • पतंग उडवताना व्यक्तीचे शरीर सरळ सूर्याच्या किरणांच्या संपर्कात येते.
  • भगवान राम यांनी सुरू केलेल्या या परंपरेला हिंदू धर्मात आजही पाळले होते. 
  • मकरसंक्रांतीच्या दिवशी भारतातील अधिकांश भागात पतंग उडवले जातात.

मुंबई: हिंदू संस्कृतीत मकर संक्रांतीला(makar sankrant) खूप खास महत्त्व आहे. या दिवशी श्रद्धाळू भक्तगण भक्ती-भावाने सूर्य देवाची(lord sun) पुजा(worship) करतात. तसेच या दिवशी उत्साहाने पतंग बाजी(kite flying) केली जाते. मकरसंक्रांतीच्या दिवशी भारतातील अधिकांश भागात पतंग उडवले. या दिवशी पतंग उडवण्यामागे केवळ धार्मिक कारणच नव्हे तर वैज्ञानिक कारणही आहे. जाणून घ्या दिवशी पतंग उडवण्यामागची काही खास कारणे आणि त्यामुळे होणारे लाभ

मकरसंक्रांतीला सूर्यउत्तरायण असते. याच कारणामुळे यावेळेस सूर्याची किरणे व्यक्तींसाठी एखाद्या औषधाप्रमाणे काम करतात. थंडीच्या दिवसांत व्यक्तीच्या शरीरात कफाचे प्रमाण वाढते. यासोबतच त्वचाही कोरडी होते. यावेळेस छतावर उभे राहून पतंग उडवल्याने यासमस्यांपासून सुटका मिळते. 

याशिवाय पतंग उडवताना व्यक्तीचे शरीर सरळ सूर्याच्या किरणांच्या संपर्कात येते. यामुळे त्याला सर्दीशी संबंधित अनेक शारिरीक समस्यांपासून सुटका मिळते. यासोबतच व्हिटामिन डीही योग्य प्रमाणात शरीरास प्राप्त होते. व्हिटामिन डी शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे व्हिटामिन शरीरासाठी एका जीवदायिनीप्रमाणे काम करते. 

वैज्ञानिक तथ्यांनुसार, उत्तरायणामध्ये सूर्याची किरणे थंडीचा प्रकोप आणि थंडीमुळे होणाऱ्या रोगांपासून आपला बचाव करतात. अशातच घराच्या छतावर जेव्हा लोक पतंग उडवतात तेव्हा सूर्याची किरणे औषधांप्रमाणे काम करतात. 

पतंग उडवल्याने मनुष्याचा मेंदू नेहमी सक्रिय राहतो. यामुळे हात आणि मानेच्या मांसपेशीमध्ये लवचिकपणा येतो. यासोबतच मन आणि मेंदू प्रसन्न राहतो तसेच चांगल्या हार्मोन्सचे प्रमाण वाढते. पतंग उडवताना डोळ्यांची एक्सरसाईजही होते. 

भगवान श्रीरामांनी केली होती पतंग उडवण्याची सुरूवात

पुराणांमध्ये उल्लेख आहे की मकरसंक्रांतीवर पहिल्यांदा पतंग उडवण्याची परंपरा भगवान श्रीराम यांनी सुरू केली होती. तामिळच्या तन्दनानरामायणनुसार भगवान राम यांनी पतंग उडवला होता तो स्वर्गलोकातील इंद्रदेवाकडे जाऊन पोहोचला होता. भगवान राम यांनी सुरू केलेल्या या परंपरेला हिंदू धर्मात आजही पाळले होते. 

 मकर संक्रांतीला तिळाचे दान केल्याने राहू आणि शनिदोष दूर होतात. असे मानले जाते की, तिळाची उत्पत्ती भगवान विष्णूच्या शरीरातून झाली होती, त्यामुळे या दिवशी तिळाचे महत्व आणखी वाढते.  यादिवशी तिळाच्या दानासोबतच तिळाच्या पाण्याने स्नान, तिळाला स्पर्श करणे आणि खाणेही आवश्यक असते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी