मुंबई: भगवान श्रीकृष्णाचा(shri krishna janmashatmi) जन्मसोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. कृष्ण जन्माचा सोहळा मोठ्या उत्साहात सगळीकडे साजरा होतो. अनेक ठिकाणी जन्माष्टमी साजरी करण्याची तयारी सुरू झाली आहे. मथुरा वृंदावनह अनेक ठिकाणी जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो. या निमित्ताने तुम्ही श्रीकृष्णाच्या अनेक गोष्टी तर नक्कीच ऐकल्या असतील. त्यापैकीच एक म्हणजे त्यांनी केलेले १६ हजार विवाह आणि त्यांचे दीड लाखाहून अधिक पुत्र.why shri krishna marries with 16 thousands girls
अधिक वाचा - या दिशेला मोरपीस ठेवल्याने मिळतात अनेक लाभ, जीवनात येतो आनंद
महाभारतानुसार भगवान श्रीकृष्णा्या १६,१०७ पत्नी होत्या. त्यातील पहिला विवाह त्यांनी देवी रुक्मिणीशी केला होता आणि यासाठी त्यांनी रुक्मिणी देवींचे हरण केले होते. यानंतर त्यांनी जाम्वती, सत्यभामा, कालिंदी, मित्रबिंदा, सत्या, भद्रा आणि लक्ष्मणाशी विवाह केला. या ८ पत्नींना श्रीकृष्णाच्या पट्टराणी मानल्या जात. मात्र याशिवायही श्रीकृष्णाने हजारो लग्न केली होती.
पौराणिक कथांनुसार श्रीकृष्णाने भस्मासूर नावाच्या राक्षसाच्या अत्याचारातून १६ हजार मुलींना वाचवले आणि त्यांना कारावासातून मुक्त केले. जेव्हा या मुली आपल्या घरी गेल्या तेव्हा समाजाने तसेच कुटुंबांने त्यांना चरित्रहीन असल्याचे सांगत त्यांना स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा श्रीकृष्णांनी १६ हजाराहून अधिक रूपे घेतली आणि या सर्व मुलींशी लग्ने केली.
अधिक वाचा - ४८ मुलांचा बाप आहे हा तरुण, पण लग्नासाठी मिळत नाही मुलगी
भगवान श्रीकृष्ण यांच्या मुला-मुलींबाबत अनेक कथा प्रचलित आहेत. पुराणानुसार श्रीकृष्णाला १ लाख ६१ हजार ८० पुत्र होते. त्यांच्या सर्व पत्नींना १०-१० पुत्र आणि १-१ पुत्री होती. यानुसार श्रीकृष्णा्या १ लाख ६१ हजार ८० पुत्र आणि १६ हजार १०८ कन्या होत्या.