Anant Chaturdahsi Puja: अनंत चतुर्दशीला 'या' मंत्रोच्चाराने करा श्री गणेशाची पूजा!

Anant Chaturdashi Ganesh Puja: अनंत चतुर्दशीबरोबरच गणेशोत्सवाची देखील सांगता होते. या दिवशी गणपती पूजेचे विशेष महत्त्व आहे. गणेशाचे पूजन करताना काही मंत्रोच्चार केल्यास आपणास नक्कीच मन:शांती लाभेल.

Anant Chaturdahsi Puja
Anant Chaturdahsi Puja: अनंत चतुर्दशीला 'या' मंत्रोच्चाराने करा श्री गणेशाची पूजा!  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • अनंत चतुर्दशीला होते गणेशोत्सवाची सांगता
  • अनंत चतुर्दशी दिवशी केली जाते विशेष पूजा
  • अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश मंत्र पठण मानले जाते शुभ

मुंबई: आज (१ सप्टेंबर) अकरा दिवसांच्या गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस आहे. अनंत चतुर्दशीच्या या दिवशी केल्या गेलेल्या गणेशपूजनामुळे घरात आनंद आणि समृद्धी सतत नांदते असं म्हटलं जातं. गणेशाच्या कृपेने सर्व दु: ख दूर होतात. आज बाप्पांना निरोप देण्याचा दिवस असल्याने भाविकांचं अंतकरण नक्कीच जड होतं. पण आजच्याच दिवशी अनंत चतुर्दशीची विशेष पूजा देखील केली जाते. त्यामुळे मनाला एक प्रकारचं समाधान देखील लाभतं. त्यामुळे गणपती आणि विष्णू पूजन एकत्र केल्यास या दिवसाचा महिमा आणि पूजेचं सामर्थ्य आणखी वाढतं.

अशी करा गणेशची पूजा

सकाळी लवकर उठून स्नान करुन गणेशाची पूजा करावी. पूजेमध्ये श्रीगणेशला सिंदूर, चंदन, जाणवं, दुर्वा, लाडू किंवा मोदक असं मिष्टान्न अर्पण करा. धूप आणि दिवे लावून आरती करा.

पूजेमध्ये हा मंत्र जप करा-

प्रातर्नमामि चतुराननवन्द्यमानमिच्छानुकूलमखिलं च वरं ददानम्।
तं तुन्दिलं द्विरसनाधिपयज्ञसूत्रं पुत्रं विलासचतुरं शिवयो: शिवाय।।

प्रातर्भजाम्यभयदं खलु भक्तशोकदावानलं गणविभुं वरकुञ्जरास्यम्।
अज्ञानकाननविनाशनहव्यवाहमुत्साहवर्धनमहं सुतमीश्वरस्य।।

या मंत्राचा अर्थ असा आहे की, मी अशा देवताची उपासना करतो, ज्याची स्वत: ब्रह्मदेव पूजा करतात. अशी देवता, जी सर्व इच्छा पूर्ण करण्यास सक्षम आहेत, भीती दूर करणार आहेत, शोक नष्ट करतील, सद्गुणांचे नायक आहेत, गजमुख आहेत, अज्ञानाचा नाश करणारे आहेत. 

मी शिव पुत्र गणेशाची सुख-समाधानाने यांची पूजा करतो आणि त्यांचे स्मरण करतो.

लक्ष्मी-विनायक मंत्राचा जप करा

दन्ताभये चक्र दरो दधानं, कराग्रस्वर्णघटं त्रिनेत्रम्।
धृताब्जया लिंगितमब्धिपुत्रया लक्ष्मी गणेशं कनकाभमीडे।।
श्रीं गं सौम्याय गणपतये वर वरदे सर्वजनं में वशमानय स्वाहा।।

जर तुम्हावर लक्ष्मी कृपा कायम हवी असे वाटत असेल तर या लक्ष्मी-विनायक मंत्राचा किमान १०८ वेळा जप करावा. मंत्र जप करण्यासाठी कमळाची फुले वापरा. हे लक्षात ठेवावे की मंत्राचा जप योग्य उच्चारण करुन केलं पाहिजं.

आपण या मंत्राचा जप करण्यास सक्षम नसल्यास आपण या सोप्या मंत्रांचा जप करू शकता.

  1. श्रीगणेश मंत्र- ॐ महोमेदाराय नम:. ओम विनायकया नम:.
  2. महालक्ष्मी मंत्र- ॐ महालक्ष्मयै नमः। ओम दिव्या नम:

या मंत्रांचा जप केल्याने लक्ष्मीकृपा कायम राहते असं म्हटलं जातं. तसेच, घरात आनंद आणि समृद्धी नांदते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी