Shiva Worship: श्रावणात भगवान शंकराच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. श्रावणाच्या सोमवारी भगवान शंकराची आराधना केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. धार्मिक मान्यतेनुसार भगवान शंकराला श्रावण महिना अतिशय प्रिय आहे. या महिन्यात भोलेनाथाची विधिवत पूजा केली जाते. श्रावणाच्या सोमवारी उपवास केल्यास भोलेनाथाच्या कृपेने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात, असा समज आहे. ज्योतिष शास्त्रानुसार श्रावण महिन्यात भाविकांनी त्यांच्या राशींनुसार भगवान शंकराची पूजा केल्यास महादेव लवकर प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. जाणून घेऊया श्रावण महिन्यात महादेवाची पूजा कशी करावी.
मेष राशीच्या भाविकांनी भगवान महादेवाला लाल फुले अर्पण करा आणि पाण्यात गूळ घालून भोलेनाथला अभिषेक घालावा. यासोबतच नागेश्वराय नमः मंत्राचा जप करावा.
या राशीच्या लोकांनी दही, चंदन आणि पांढर्या फुलांसह शिवाला जलमिश्रित दूध अर्पण करावे. पूजा करताना रुद्राष्टकांचे पठण करावे.
मिथुन राशीच्या लोकांनी शिवाचा अभिषेक करावा आणि बेलपत्र अर्पण करावे. यासोबतच ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा.
Read Also : भाजप महिला पदाधिकाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला
या राशीच्या लोकांनी भोलेनाथांना शुद्ध तुपाचा अभिषेक करावा आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा.
सिंह राशीच्या शिवलिंगावर गूळमिश्रित पाणी आणि गहू अर्पण करणे खूप फायदेशीर ठरेल आणि यासह महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडासमोर तुपाचा दिवा लावा.
या राशीच्या भोलेनाथला प्रसन्न करण्यासाठी भगवान महादेवाला उसाच्या रसाने अभिषेक करा आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा.
Read Also : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान
या राशीच्या लोकांनी महादेवाला सुगंधी अत्तर किंवा सुगंधी पाण्याने अभिषेक करावा आणि दररोज शिवाच्या सहस्रनामांचा जप करावा.
वृश्चिक राशीच्या लोकांनी शिवाला पंचामृताने अभिषेक करावे. यासोबतच रोज रुद्राष्टकांचे पठण किंवा श्रवण करावे.
या राशीच्या लोकांनी भगवान शिवाला केशरयुक्त दुधाचा अभिषेक करावा आणि बेलची पाने आणि पिवळी फुले अर्पण करावीत. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा.
मकर राशीच्या लोकांनी शिवलिंगावर पाण्यात गहू मिसळून शिवाची पूजा करावी. तसेच शिव पंचाक्षर मंत्राचा रोज जप करावा.
Read Also : आजपासून खाद्यपदार्थांवर ५ टक्के जीएसटी लागू
या राशीच्या लोकांनी पाण्यात पांढरे तीळ मिसळून शिवलिंगावर अर्पण करून पूजा करावी. शिव चालिसा पठण करावी.
या राशीच्या लोकांनी शिवलिंगावर जलमिश्रित दूध आणि साखरेची मिठाई अर्पण करावी आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा.