Numerology and Spouse : अंकाद्वारे देखील निवडू शकता तुमचा लव्ह पार्टनर किंवा जोडीदार; जाणून घ्या कसे?

Numerology in marathi| बऱ्याचदा खूप जण आपला लव्ह पार्टनर किंवा जीवनसाथी निवडताना गोंधळून जातात. अशा वेळी एखाद्याला आपला सोबती बनवण्यापूर्वी त्याचे गुण, स्वभाव इत्यादी जाणून घेण्याचा ते सर्वतोपरी प्रयत्न करत असतात. हे सुद्धा साहजिकच आहे, आयुष्यभर कोणाशी तरी जोडले जाणे, त्याच्याशी नाते कसे असेल, त्याच्या सवयी तुम्हाला अनुकूल असतील का, त्याच्यासोबत तुमच्या आयुष्याचा गाडा कसा चालेल, हे जाणून घेण्याची इच्छा मुलगा आणि मुलगी दोघांनाही असते.

You can also choose your life partner with Numerology and Spouse numbers
अंकाद्वारे देखील निवडला जाऊ शकतो आयुष्याचा जीवनसाथी   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अंकशास्त्राद्वारे आकडेवारीतूनही निवडला जाऊ शकतो आयुष्याचा जीवनसाथी.
  • मूलांक क्रमांक एक असलेल्यांसाठी ते लोक चांगले जीवनसाथी सिद्ध होऊ शकतात.
  • अंकशास्त्रानुसार, ८, १७ आणि २६ तारखेला जन्मलेले लोक आठव्या क्रमांकासाठी चांगले जोडीदार सिद्ध होऊ शकतात.

Astrology | नवी दिल्ली : बऱ्याचदा खूप जण आपला लव्ह पार्टनर (Love Partner) किंवा जीवनसाथी (Life Partner) निवडताना गोंधळून जातात. अशा वेळी एखाद्याला आपला सोबती बनवण्यापूर्वी त्याचे गुण, स्वभाव इत्यादी जाणून घेण्याचा ते सर्वतोपरी प्रयत्न करत असतात. हे सुद्धा साहजिकच आहे, आयुष्यभर कोणाशी तरी जोडले जाणे, त्याच्याशी नाते कसे असेल, त्याच्या सवयी तुम्हाला अनुकूल असतील का, त्याच्यासोबत तुमच्या आयुष्याचा गाडा कसा चालेल, हे जाणून घेण्याची इच्छा मुलगा आणि मुलगी दोघांनाही असते. दरम्यान आता ही समस्या अंकशास्त्राच्या (Numerology) सहाय्याने अगदी सहजपणे सोडवली जाऊ शकते. ज्याच्या मदतीने कोणाची जोडी कोणत्या व्यक्तीशी जुळेल हे जाणून घेता येऊ शकते. कोणती संख्या असलेल्या व्यक्तीचा कोणत्या क्रमांकाशी अधिक चांगला समन्वय असतो हे याद्वारे जाणून घेतले जाऊ शकते. (You can also choose your life partner with Numerology and Spouse numbers). 

अधिक वाचा : पत्नीच्या नावे उघडा हे खास खाते, दरमहा मिळवा ४५,००० रुपये

मूलांक १ - मूलांक क्रमांक एक असलेल्यांसाठी ते लोक चांगले जीवनसाथी सिद्ध होऊ शकतात. ज्यांचा मूलांक १, ४, किंवा ७ येतो. अंकशास्त्रानुसार, जर त्यांना एखाद्याला लव्ह पार्टनर किंवा जीवनसाथी बनवायचा असेल तर या मूलांकातील लोकांशी त्यांचे संबंध चांगले राहतात.

मूलांक २ - अंकशास्त्रानुसार, मूलांक क्रमांक दोन असलेल्या लोकांनी नेहमीच आपला लव्ह पार्टनर किंवा जीवन साथीदार असा बनवावा की ज्या पुरुष किंवा स्त्रीचा जन्म २० जून ते २७ जुलै दरम्यान झाला आहे आणि त्यांचा मूलांक क्रमांक दोन आहे. ते त्यांच्यासाठी चांगले जीवनसाथी सिद्ध होतील. अशा लोकांमुळे तुमचे जीवन आनंदी होईल.

मूलांक ३ - अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा जन्म १९ फेब्रुवारी ते २१ मार्च आणि २१ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर दरम्यान झाला आहे आणि त्यांचा मूलांक क्रमांक ३ आहे, असे पुरुष किंवा स्त्री मूलांक ३ च्या साथीदारासाठी चांगले जीवनसाथी असल्याचे सिद्ध होते.

अधिक वाचा : पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी मौनी अमावस्या आहे खास

मूलांक ४ - अंकशास्त्रानुसार, मूलांक ४ शी संबंधित लोकांनी अशा लोकांना आपला जीवनसाथी किंवा लव्ह पार्टनर बनवले पाहिजे की, ज्यांचा जन्म २१ मार्च ते २८ एप्रिल किंवा १० जुलै ते २० ऑगस्ट दरम्यान झाला असेल आणि त्यांचा मूलांक क्रमांक ४ असेल. अंकशास्त्रानुसार अशी व्यक्ती चौथ्या क्रमांकासाठी खूप चांगली जीवनसाथी सिद्ध होऊ शकते.

मूलांक ५ - अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा जन्म २१ मे ते २० जून किंवा २१ ऑगस्ट ते २० सप्टेंबर या कालावधीत झाला आहे आणि त्यांचा मूलांक ५ आहे, अशा महिला किंवा पुरुष मूलांक पाचशी संबंधित लोकांसाठी चांगले साथीदार आहेत.

मूलांक ६ - अंकशास्त्रानुसार, मूलांक ६ शी संबंधित लोकांनी त्यांना नेहमीच आपला लव्ह पार्टनर किंवा जीवनसाथी बनवावे, ज्यांचा जन्म २१ सप्टेंबर ते १९ ऑक्टोबर किंवा २० एप्रिल ते १८ मे दरम्यान झाला असेल आणि त्यांचा मूलांक ६ असेल. अंकशास्त्रानुसार, मूलांक ६ च्या लोकांच्या जीवनाची गाडी त्यांच्याबरोबर चांगली चालते.

मूलांक ७ - अंकशास्त्रानुसार, मूलांक ७ आणि मूलांक एक असलेले लोक खरे साथीदार असल्याचे सिद्ध करतात. त्याचप्रमाणे जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये दरम्यान जन्मलेली सात मूलांक संख्या असलेली स्त्री किंवा पुरुषही त्यांच्यासाठी भाग्यवान ठरतील असे मानले जाते. 

अधिक वाचा : Mahindra Thar चक्क शोरूममधून खाली लटकली, पाहा व्हिडिओ

मूलांक ८ - अंकशास्त्रानुसार, ८, १७ आणि २६ तारखेला जन्मलेले लोक आठव्या क्रमांकासाठी चांगले जोडीदार सिद्ध होऊ शकतात. अशा लोकांशी त्यांते संबंध अधिक चांगले राहतील.

मूलांक ९ - अंकशास्त्रानुसार, जे लोक ९, १८ आणि २७ तारखेला जन्मलेले आहेत ते मूलांक क्रमांक ९ साठी खूप चांगले जीवनसाथी किंवा लव्ह पार्टनर असल्याचे सिद्ध करतात

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी