Samudrik Shastra: तुमचे नाक तुमच्या भविष्याविषयी बरेच काही...समुद्र शास्त्रात दिले आहेत चिन्हे

Astrology : नाकाद्वारे आपण श्वास घेतो, तसेच विविध प्रकारचे वास घेऊ शकतो. मात्र नाकाचे माहात्म्य (Importance of Nose)फक्त इतकेच नाही. तर तुमच्या नाकातून तुम्ही एखाद्याचे भविष्य देखील जाणून घेऊ शकता. समुद्र शास्त्राचे (Samudrik Shastra) एक वेगळे महत्त्व असते. सामुद्रिक शास्त्रानुसार नाकाच्या रचनेवर अनेक गोष्टी अवलंबून असतात. समुद्रिक शास्त्राने याची काही लक्षणे सांगितली आहेत.

Samudrik Shastra
समुद्रिकशास्त्राप्रमाणे नाकाची लक्षणे 
थोडं पण कामाचं
  • समुद्रशास्त्राचे वेगळेच महत्त्व आहे
  • नाकाचा आणि भविष्याचाही संबंध
  • पाहा कोणत्या नाकाचे लोक कसे असतात

Personality as per Nose : नवी दिल्ली : आपले नाक हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा भाग असतो. नाक (Nose) फक्त आरोग्याच्याच दृष्टीने महत्त्वाचे नसते तर आपल्या दिसण्यावर त्याचा मोठा प्रभाव असतो. नाकाद्वारे आपण श्वास घेतो, तसेच विविध प्रकारचे वास घेऊ शकतो. मात्र नाकाचे माहात्म्य (Importance of Nose)फक्त इतकेच नाही. तर तुमच्या नाकातून तुम्ही एखाद्याचे भविष्य देखील जाणून घेऊ शकता. समुद्र शास्त्राचे (Samudrik Shastra) एक वेगळे महत्त्व असते. सामुद्रिक शास्त्रानुसार नाकाच्या रचनेवर अनेक गोष्टी अवलंबून असतात. नाकाच्या रचनेवरून तुम्हाला कोणत्याही माणसाच्या व्यक्तिमत्त्वाची आणि भविष्याची माहिती मिळू शकते. यासाठी सामुद्रिक शास्त्रात अनेक महत्त्वाचे चिन्हे सांगण्यात आले आहेत. नाकाच्या संरचनेशी संबंधित ही चिन्हे कोणती आहेत आणि त्याचा काय परिणाम असतो ते जाणून घेऊया. (Your nose has significance as per Samudrik Shastra) 

अधिक वाचा : प्रशांत दामलेंचा 12 हजार 500 प्रयोगांचा विक्रम

सामुद्रिक शास्त्राप्रमाणे नाकाची लक्षणे -

लहान नाक - मजेशीर लोक
सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या लोकांचे नाक लहान असते त्यांचा स्वभाव खूपच खोडकर आणि विनोदी असतो. असे लोक कोणत्याही गोष्टीचे जास्त टेन्शन घेत नाहीत, चिंता करत नाहीत आणि आयुष्य त्यांच्या शैलीत जगतात. त्यांच्या या बिनधास्त आणि जिवंत स्वभावामुळे अनेक लोकांना ते हुशार किंवा मोठे वाटतात. अनेकदा तसे नसतेही मात्र त्यांच्या वागण्याच्या शैलीतून एक वेगळेच चित्र निर्माण होते.लहान नाक असलेले लोक नातेसंबंध टिकवून ठेवण्यात तज्ञ मानले जातात.

अधिक वाचा :  बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी वापरा 'हे' पदार्थ

लांब नाक - सहजा भावनांच्या आहारीत जात नाहीत 
ज्या लोकांचे नाक लांब असते असे लोक सहजासहजी भावनाविवश होत नाहीत. ते भावनांच्या आहारी जाऊन कोणताही निर्णय घेत नाहीत. ज्या लोकांचे नाक लांब असते ते कणखर स्वभावाचे मानले जातात. या प्रकारचे लोक कौटुंबिक गोष्टीत फारसे गुंतून पडत नाहीत आणि भावनांच्या आधारे विचारदेखील करत नाहीत. असे लोक दृढनिश्चयी असतात. या प्रकारच्या लोकांनी एखादे काम हाती घेतले की ते पूर्ण करतातच. अशा लोकांना प्रवासाची खूप आवड असते. हे लोक नीतीमूल्याच्या मार्गावर चालतात. 

जाड लोक- चांगले मित्र 
ज्या लोकांचे नाक जाड असते असे लोक मैत्री चांगली निभावतात. सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या लोकांचे नाक जाड असते ते प्रसन्न स्वभावाचे मानले जातात. या लोकांच्या चेहऱ्यावर एक चमक असते, एक स्मित असते. हे लोक मित्रांच्या जिवाभावाचे असतात. ते आपल्या मैत्रीसाठी वाटेल ते करतात.  त्यांच्या वागण्याबद्दल कोण काय म्हणेल याचा ते विचार करत नाहीत. अशी माणसे कुटुंब आणि समाजाला नावलौकिक मिळवून देतात. त्यांच्याशी निगडीत लोकांना ते खूश ठेवतात.

अधिक वाचा : वास्तुशास्त्रानुसार प्रगतीसाठी अशी हवी बेडरूमची रचना

दबलेले नाक- बंधने नको असतात 
साधारणपणे ज्या लोकांचे नाक दाबलेले असते अशा लोकांना कोणाचेही बंधन नको असते. असे लोक प्रामाणिकपणे जगतात. त्यांना सहसा भीती वाटत नाही. ते रोखठोक बोलतात. अंगावर आलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करतात. मात्र त्याचबरोबर संवेदनशील असतात. प्रसंगी भावनिकदेखील होतात.

पातळ नाक - स्वाभिमानी लोक 
पातळ नाकाचे वेगळे इन्प्रेशन अशते. असे लोक स्वभावाने स्वाभिमानी असतात. या लोकांना यश देखील लवकर मिळते. वरवर कठोर वाटले तरी आतून ते कोमल असतात. आपल्या मानी स्वभावामुळे काहीसे अहंकारी असतात. त्यामुळे ते लगेच चिडतात. मात्र ते कोणत्याही एका मताबाबत आग्रही नसतात. परिस्थितीनुसार त्यात बदल होत राहतात.

(डिस्क्लेमर  : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. तपशीलवार आणि अधिक माहितीसाठी, कृपया संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला घ्या. मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. टाइम्स नाऊ मराठी कोणतीही अंधश्रद्धा पसरवू  इच्छीत नाही, पण ज्यांचा या सर्व गोष्टींवर विश्वास आहे ते प्रयोग करावा की नाही याचा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेत. टाइम्स नाऊ मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी