आज १३ जुलै २०२२ रोजी गुरुपौर्णिमा साजरी होत आहे. आषाढ महिन्यातील पौर्णिमा गुरूपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या पौर्णिमेला व्यासपौर्णिमाही म्हणतात. व्यासांनी महाभारत लिहिले, व्यास गुरुंचेही गुरू मानले जातात. म्हणून या दिवशी व्यासांची, दीक्षा गुरू तसे आई वडिलांची पुजा करून त्यांना वंदन करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. आपण गुरूकडून विद्या मिळवतो म्हणून गुरूला गुरू दक्षिणा देऊन त्यांचे आशिर्वाद घेतल्याने विद्या सफल होते अशी श्रद्धा आहे.