हरितालिकेचे व्रत केल्याने आपल्या पतीचे आयुष्य वाढते अशी मान्यता आहे. तसेच हे व्रत केल्यास अविवाहित तरुणींन मनासारखा पती मिळतो असेही सांगितले जाते. या दिवशी भगवान शंकर आणि पार्वतीचे पुर्नमिलन झाले होते. भगवान शंकर आपल्याला पती म्हणून मिळवण्यासाठी माता पार्वतीने तपस्या केली होती, आणि भगवान शंकर प्रसन्न होऊन त्यांनी माता पार्वतीचा स्विकार केला होता.