Makar Sankranti 2021 whatsApp Marathi wishes and Messages: नव्या वर्षाची सुरुवात झाल्यानंतर आता सर्वच जण या वर्षातील पहिल्यावहिल्या सणाला म्हणजेच मकरसंक्रांतीसाठी (Makar Sankranti 2023) सज्ज झाले आहेत. शनिवारी 14 जानेवारी २०२३ मकर संक्रांतीचा सण सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. दरम्यान, कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षी आपल्याला अनेक सण मनासारखे साजरे करता आले नाही. यंदा पुन्हा कोरोना संकट असल्यामुळे अद्यापही आपण एकत्र येणं शक्यतो टाळलं पाहिजे. पण असं असलं तरीही डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आपण मकरसंक्रांत नक्कीच साजरी करु शकतो आणि एकमेकांना शुभेच्छा देऊ शकतो.