शंकराचा प्रिय महिना हा श्रावण महिना मानला जातो. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी भगवान शंकराची विशेष पूजा केली जाते. तर श्रावण महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी मंगळागौरीचे व्रत केले जाते. हे व्रत भोलेनाथ यांची पत्नी पार्वती देवीसाठी केले जाते. हे व्रत लग्न झालेल्या महिला आपल्या पतीच्या दीर्घायुसाठी तसेच त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी ठेवतात. तसेच ज्या दाम्पत्याला संतान सुख मिळत नाही आहे त्या महिलांनाही या व्रताचा लाभ होतो.