राशी भविष्य १ ऑक्टोबर : पाहा तुमच्यासाठी कशी असेल नवीन महिन्याची सुरूवात 

राशी भविष्य, १ ऑक्टोबर २०२० : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य.

Horoscope
राशी भविष्य  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • १ ऑक्टोबर २०२०: दिवस शुभ आहे
  • सूर्योदय - सकाळी ६ वाजून ३३ मिनिटांनी तर सूर्यास्त सायंकाळी ६ वाजून २३ मिनिटांनी

राशी भविष्य 1 October 2020: कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: एखाद्या नव्या कार्याची सुरूवात होऊ शकते. सुगंधित अत्तराचा वापर करा. अविवाहीत तरुण-तरुणींच्या विवाहात येणाऱ्या अडचणी समाप्त होतील. गरीबांना अन्न दान करा. शुभ रंग - पिवळा.
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: हातात असलेलं काम पूर्ण करा आणि मगचं दुसऱ्या कामाची सुरूवात करा. धनलाभ झाल्याने तुम्ही प्रसन्न राहाल. कौटुंबिक जीवनात आनंद निर्माण होईल. शुभ रंग - पांढरा. 
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: नोकरी करणाऱ्या तरुणांना आनंदाची बातमी मिळेल. बँकिंग आणि मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे. शुभ रंग - लाल.
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: कामात खूपच बिझी असताना सुद्धा तुम्ही कौटुंबिक कार्यासाठी वेळ काढाल. विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळेल. श्री विष्णू जीं ची उपासना करा. शुभ रंग - निळा. 
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात नव्या संधी उपलब्ध होतील. सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होईल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. शुभ रंग - हिरवा. 
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: वाद-विवाद टाळण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांसाठी दिवस खूपच चांगला असेल. एखादं प्रलंबित काम पूर्ण होईल. शुभ रंग - नारंगी.
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: नोकरी करणारे तरुण-तरुणी आपल्या कार्याच्या जोरावर वरिष्ठांची मनं जिंकतील. विद्यार्थी शिक्षणात यश प्राप्त करतील. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना नव्या संधी उपलब्ध होतील. शुभ रंग - पांढरा. 
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: व्यवसायात नव्या संधी उपलब्ध होतील. जुने मित्र किंवा नातेवाईकांची भेट होईल. कौटुंबिक आयुष्यात वाद होण्याची शक्यता आहे. श्री हनुमानजींची उपासना करा. शुभ रंग - लाल.
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: मानसिक शांतता लाभेल. बोलण्यावर संयम ठेवा नाहीतर कामे बिघडू शकतात. तुमच्या स्वभावाचा कोणी गैरफायदा घेणार नाही याची काळजी घ्या. वरिष्ठांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. मुलांना यश मिळेल. शुभ रंग - निळा.
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: तुम्ही कार्यात निपुण आहात त्यामुळे तुम्हाला अधिक कामे मिळतील. यामुळे तुम्ही यशाच्या दिशेने वाटचाल कराल. स्वभावाने तुम्ही चतुर आहात त्यामुळे गर्दीमध्येही तुम्ही स्वत:ची ओळख बनवू शकता. शुभ रंग - पिवळा. 
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: अनेक दिवसांपासून प्रलंबित कामं पूर्ण होतील. नोकरीत यश प्राप्त होईल. वरिष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. शुभ रंग - हिरवा.
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. अध्यात्माकडे कल राहील. विविध क्षेत्रात लाभ मिळण्याची शक्यता आहे. दुसऱ्यांनी दिलेल्या सल्ल्यांचा जरूर विचार करा. विचार करून कामे करा. शुभ रंग - पांढरा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी