राशी भविष्य १० जुलै: 'या' राशीच्या लोकांना होणार व्यवसायात होणार फायदा, 'या 'राशीच्यांचे होणार पैसे खर्च

राशी भविष्य १० जुलै २०२० : आजचा दिवस भगवान शंकर आणि विष्णू यांच्या उपासनेचा आहे. या पवित्र श्रावण महिन्यात आपले मन शंकराला समर्पित करा.

10 july rashifal in marathi aajche rashi bhavishya
राशी भविष्य १० जुलै २०२०  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • वृषभ राशीच्यांचे पैसे खर्च होण्याची शक्यता
  • कर्क राशीच्यांचे अडलेले काम पूर्ण होणार
  • मुलाच्या यशाने आनंदी राहतील मीन राशीचे लोक

राशी भविष्य 10 July 2020: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस?

आज मेष आणि मीन राशीचे लोक व्यवसायात सफलता मिऴवतील. तूळ आणि मकर राशीच्यांना नवीन संधी मिऴतील. कुंभ आणि मीन राशीच्यांनी आरोग्याबाबत निष्काऴजीपणा करू नये. आता आजचे विस्तृत राशीभविष्य जाणून घेऊया.

1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today:  आज आपले मन धार्मिक राहील. व्यवहारात बदल सुखद आहेत. व्यवसायिकांना लाभ होईल. चंद्राचा प्रभाव शुभ आहे. प्रेमसंबंध चांगले राहतील. शुभरंग : पिवऴा.

2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: आजचा दिवस भगवान शंकराच्या पूजेत मन समर्पित करण्याचा आहे. चांगल्या कामांमध्ये पैसे खर्च होतील. शुक्र आणि चंद्राच्या भ्रमणामुऴे प्रेमसंबंध चांगले राहतील. आज आपल्या बोलण्यामुऴे लाभ होईल. शुभरंग : निऴा.

3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today:  व्यवसायात प्रगती होईल. राहू आणि बुधाच्या भ्रमणामुळे नोकरीबाबत काहीही निर्णय विचारपूर्वक घ्या. वैवाहिक जीवनात प्रेम राहील. शुभरंग : निळा.

4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today : आजचा दिवस विद्यार्थ्यांचा आहे. नोकरीसंदर्भात लाभ होईल. महिला मित्राच्या मदतीने अडलेले एखादे काम पूर्ण होईल. शुभरंग : पांढरा.

5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today : सूर्य आणि चंद्र आज आपल्याला यश आणि प्रतिष्ठा देतील. व्यवसायात वृद्धी होईल. विद्यार्थ्य़ांना नवीन संधी मिऴतील. प्रेमात विश्वास कायम ठेवा. आदित्यहृदयस्तोत्र पठण करा. शुभरंग : लाल.

6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today : नोकरीत बढतीमुऴे प्रसन्न राहाल. प्रेमसंबंधात आज चंद्रामुळे अतिभावुकता येऊ शकते. आरोग्याबाबत समस्या होऊ शकतात. भगवान विष्णूची पूजा करत राहा. शुभरंग : हिरवा.

7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today : मैत्रीमध्ये प्रसन्नता राहील. व्यवसायात लाभ आहे. आरोग्यसुखासाठी हनुमानबाहुक पठण करा. आज जोडीदाराचे सहकार्य आपल्याला आशावादी बनवेल. अन्नदान करा. शुभरंग : हिरवा.

8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today : व्यवसायात लाभ होईल. गहू आणि गू्ऴ दान करा. प्रेमात विश्वास कायम ठेवा. धनलाभाचे संकेत आहेत. शुभरंग : पिवऴा.

9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today : आज संतानाच्या विवाहासंदर्भात चांगली बातमी मिळेल. व्यवसायात लाभाचे संकेत आहेत. तरुणांच्या प्रेमसंबंधात तणाव येऊ शकतात. शुभरंग : पिवऴा.

10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: काही नात्यांमध्ये तणाव येऊ शकतात. मोठ्या भावाकडून लाभ होऊ शकतो. आज वाहन खरेदी होऊ शकेल. सुंदरकांड पठण करा. शुभरंग : निऴा.

11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today : आज राजकारणी सफल होतील. दाम्पत्य जीवनात गोडवा कायम राहील. बजरंगबाण पठण करा. गाईला गूळ द्या. तरुण प्रेमसंबंधात खूपच भावुक होऊ शकतात. शुभरंग : निळा.

12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today : आज धनलाभाचे संकेत आहेत. संतानाच्या सफलतेने खुश राहाल. दांपत्यजीवन सुखी राहील. विष्णुसहस्रनाम पठण करा. धार्मिक पुस्तके दान करा. शुभरंग : पिवऴा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी