राशी भविष्य ११ ऑगस्ट: या राशीसाठी आहे आज भाग्यकारक दिवस

राशी भविष्य, ११ ऑगस्ट २०२० : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

आजचे राशी भविष्य ११ ऑगस्ट:
11 august 2020 rashifal in marathi aajche rashi bhavishya  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

 • मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल राहील
 • कन्या राशींच्या व्यक्तींचे आज परमेश्वराचं नामस्मरण केल्याने मन प्रसन्न होईल.
 • धनु राशींच्या व्यक्तींसाठी  आजचा दिवस चिंतेनं आणि काळजीनं भरलेला असेल

राशी भविष्य 11 August 2020: कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

 1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल राहील. क्रोधावर नियंत्रण ठेवा. पोटाशी संबंधित आजार होण्याची शक्यता आहे. मात्र दुपारनंतरचा काळ तुमच्यासाठी उत्तम आहे. मन प्रसन्न होईल. आजचा शुभ रंग - नारंगी.
 2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: मित्रांसोबत नवे कार्य सुरू कराल. खाण्यापिण्यावर तसेच खरेदीवर खर्च कराल. भावूक होण्याचे प्रसंग येतील. आज धनलाभ होण्याची शक्यता आहे. मनात शंका सतावत राहील. पैसे खर्च होतील. आजचा शुभ रंग - पांढरा.
 3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: आज तुम्हाला भाग्याची साथ राहील. हाती घेतलेले काम पूर्ण करा. परिस्थितीत सुधारणा होईल. वैवाहिक सुख मिळेल. घरी चांगले वातावरण असेल. आजचा शुभ रंग - निळा.
 4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: आज घरातील गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल. तुम्हाला कामात समाधान मिळेल. महिलांकडून आदर मिळू शकेल. आईशी नातं चांगलं राहील. निराश होऊ नका. आजचा शुभ रंग - पिवळा.
 5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today:  घरात वाद निर्माण होऊ शकतात. कामे पूर्ण न झाल्यामुळे मनात नैराश्याचं वातावरण राहील. आज कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेताना काळजी घ्या. घर किंवा व्यवसायाच्या क्षेत्रात कामाचा ताण अधिक असेल. आजचा शुभ रंग - हिरवा.
 6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: आज परमेश्वराचं नामस्मरण केल्याने मन प्रसन्न होईल. घरातील वातावरण आनंददायी असेल. मित्र आणि प्रियजनांकडून भेटवस्तू मिळू शकते. व्यवसायिक क्षेत्रात प्रभाव निर्माण करू शकता. आजचा शुभ रंग - निळा.
 7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: आज शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबातील सदस्यांबरोबर मतभेद होण्याची शक्यता आहे. पैशांचे व्यवहार करताना किंवा भांडवलाची गुंतवणूक करताना काळजी घ्या. कोर्टाची कामे काळजीपूर्वक हाताळा. खर्चाचे प्रमाण जास्त असेल. आजचा शुभ रंग - पिवळा.
 8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today:  आज धन लाभाची शक्यता आहे. बालपणीच्या किंवा जुन्या मित्रांच्या भेटींमुळे आनंद मिळेल. नवीन मित्रांची भेट झाल्याने भविष्यात फायदा होईल. आजचा शुभ रंग - नारंगी.
 9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today:  आजचा दिवस चिंतेनं आणि काळजीनं भरलेला असेल. आरोग्य बिघडू शकते. विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. अचानक धन लाभ होईल. आजचा शुभ रंग - लाल.
 10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यकारक आहे. आज आर्थिक फायद्यांबरोबरच नशीबाचीही साथ मिळेल. प्रियजनांशी नातेसंबंधात प्रेम वाढेल. नवीन काम सुरू करण्यासाठी वेळ शुभ आहे. प्रवासाचा योग आहे. आजचा शुभ रंग - लाल.
 11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: आज कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मित्र आणि नातेवाईकांकडून भेटवस्तू मिळाल्यामुळे आनंद होईल. काम सहजपणे पूर्ण होईल. व्यवसायात फायदा होईल. आरोग्य चांगले राहील. आजचा शुभ रंग -  हिरवा.
 12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: आजचा दिवस प्रगती करण्यासाठी सक्षम असेल. वडील आणि मित्रांचे सहकार्य मिळेल. नवीन मित्र भेटतील. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचा योग आहे. आजचा शुभ रंग -पिवळा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी