राशी भविष्य १३ जानेवारी : १२ राशींचे बुधवारचे भविष्य जाणून घ्या

Daily Horoscope राशी भविष्य, १३ जानेवारी २०२१ : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

13 January 2021 rashifal in marathi
राशी भविष्य १३ जानेवारी  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • मेष राशीच्या व्यक्तींनी भगवान श्री गणेशाची आराधना करा.
  • कन्या राशींच्या व्यक्तींना दिवस शुभ आहे.
  • मकर राशीच्या व्यक्तींना मित्रपरिवारांकडून चांगली बातमी मिळेल.

Daily Horoscope 13 January 2021 Rashi Bhavishya, राशी भविष्य १३ जानेवारी २०२१ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: भगवान श्री गणेशाची आराधना करा. मनावर नियंत्रण ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. अनपेक्षित खर्च करू नका. बाहेरील खाद्य पदार्थ खाणं टाळा. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना विचारविनिमय करा. शुभ रंग : लाल.
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: मन प्रफुल्लित राहील. भाऊ-बहिणींकडून चांगला पाठिंबा मिळेल. तीर्थयात्रेला बाहेर फिरायला जाऊ शकता. मित्र-मैत्रिणींच्या भेटीमुळे मनात आनंद निर्माण होईल. शुभ रंग : मोरपंखी
  3. मिथुन राश‍ी भविष्य/ Gemini Horoscope Today: जीवनात अपयश मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. नकारात्मक विचारांपासून दूर रहा. वायफळ खर्च करणं टाळा. शुभ रंग : पांढरा. 
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: पोटाचे विकार संभवतील. विद्यार्थ्यांचे अभ्यासातून लक्ष विचलीत होईल. प्रेमळ व्यक्तीच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. साहित्य आणि लेखन क्षेत्रात तुमची गोडी निर्माण होईल. आध्यात्मिक गोष्टींपासून दूर रहा. शुभ रंग : निळा.
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: आरोग्य निरोगी राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मन प्रसन्न राहील. कामा-धंद्यात चांगलं सहकार्य मिळेल. सासरवाडीतून चांगली बातमी मिळेल. आर्थिक लाभ होईल. प्रलंबित कामं पूर्ण होतील. शुभ रंग : पांढरा.
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: दिवस शुभ आहे. मन प्रफुल्लित राहील. तुमच्या कामात यश मिळेल. दाम्पत्यांमध्ये अनुकूल वातावरण राहील. वस्तू आणि कपड्यांची खरेदी करण्यासाठी चांगला दिवस आहे. आरोग्य निरोगी राहील. विवाहित जीवनात सुख मिळेल. शुभ रंग : हिरवा. 
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद होण्याची शक्यता आहे. जलाशयापासून दूर रहा. कठीण परिश्रम केल्यानंतरही जीवनात अपयश येईल. लेखन आणि साहित्यिक क्षेत्रांत गोडी निर्माण होईल. शुभ रंग :  निळा.
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: धार्मिक कार्यात व्यस्त व्हाल. इतरांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत अडचणी येतील. चांगली बातमी मिळेल. मन अस्थिर राहील. शरीरात आळस आणि थकवा जाणवेल. शुभ रंग : लाल.
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: उच्च पदाधिकाऱ्यांकडून उत्तम सहकार्य आणि प्रतिसाद मिळेल.  मन प्रसन्न राहील. आरोग्य निरोगी राहील. धनलाभ होईल. घरातील कामात व्यस्त व्हाल. पर्यटनस्थळी बाहेर फिरायला जाऊ शकता. सरकारी कामात यश मिळेल. शुभ रंग : पिवळा.
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: दिवस शुभ आहे. मित्रपरिवारांकडून चांगली बातमी मिळेल. त्यांच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. नोकरीत पदोन्नती होईल. विवाह करणाऱ्या व्यक्तींना चांगला जीवनसाथी मिळेल. आरोग्य निरोगी राहील. शुभ रंग : निळा.
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: बाहेरील खाद्य-पदार्थ खाणं टाळा. उच्चवर्गीय पदाधिकाऱ्यांकडून उत्तम सहकार्य मिळेल. नकारात्मक विचारांपासून दूर रहा. आर्थिभगवान श्री गणेशाची पूजा-अर्चना करा. मनात अस्वस्थता जाणवेल. आरोग्याची काळजी घ्या. वैचारिकदृष्ट्या गोष्टींमुळे मनात चिंता सतावत राहील. मित्रपरिवारांच्या भेटीमुळे मतभेद होण्याची शक्यता आहे. कामात अपयश आल्यामुळे, मन अस्थिर राहील. शुभ रंग : हिरवा.
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. आर्थिक लाभ होईल. मित्र-मैत्रीणींच्या भेटीसाठी अनुकूल वातावरण राहील. उत्तम आहारामुळे आरोग्य निरोगी राहील. घरात आनंदाचे वातावरण असेल. शुभ रंग : पांढरा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी