राशी भविष्य १४ जानेवारी :मकर संक्रांतीला असे असेल तुमचे भविष्य

Daily Horoscope राशी भविष्य, १४ जानेवारी २०२१ : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

14 January 2021 rashifal in marathi
राशी भविष्य १४ जानेवारी 

थोडं पण कामाचं

 • मेष राशीच्या व्यक्ती सामाजिक तसेच सार्वजनिक क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी कराल.
 • सिंह राशीच्या व्यक्ती प्रभावशाली वाणीच्या सहाय्याने सर्वांची मनं जिंकाल.
 • धनु राशीच्या व्यवसायात भागिदारी करण्यासाठी उत्तम योग आहे.

Daily Horoscope 14 January 2021 Rashi Bhavishya, राशी भविष्य १४ जानेवारी २०२१ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

 1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: आज तुम्ही सामाजिक तसेच सार्वजनिक क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी कराल. धन लाभ होण्याचा उत्तम योग आहे. आपल्या रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. समाधानकारी व्यवहार अधिक लाभदायक असतील. आजचा शुभ रंग - लाल.
 2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: परिवारातील सदस्य किंवा जवळील मित्रांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. न्यायालयीन व्यवहारात सावधानता बाळगा किंवा असे कार्य करणं आज टाळा. पैसे अधिक खर्च होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - पिवळा.
 3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: जोडीदार आणि मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कुठल्याही प्रकारच्या वादापासून दूर राहा. आरोग्याची काळजी घ्या. अपमान होणार नाही याकडे लक्ष द्या. आजचा शुभ रंग - हिरवा.
 4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: आजचा दिवस थोडा त्रासदायक जाण्याची शक्यता अधिक आहे. मित्रांच्या भेटी होतील. कामात अडथळा येण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - नारंगी.
 5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: तुमच्या प्रभावशाली वाणीच्या सहाय्याने सर्वांची मनं जिंकाल. उत्पन्नापेक्षा अधिक पैसे खर्च होतील. विद्यार्थ्यांची अभ्यासात कामगिरी चांगली असेल. ठराविक कार्यात यश कमी मिळेल. आजचा शुभ रंग - पांढरा.
 6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: आज परमेश्वराच्या कृपेने तुम्ही ठरवलेले कार्य पूर्ण कराल. आरोग्य चांगले राहील. भोजनात गोड खाद्य मिळेल. प्रवासाचा योग लवकरच निर्माण होईल. वायफळ खर्च टाळा. आजचा शुभ रंग - निळा.
 7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: शारीरिक किंवा मानसिक त्रास जाणवण्याची शक्यता आहे. कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी विचार करा तसेच वरिष्ठांचं मार्गदर्शन घ्या. आर्थिक अडचण जाणवण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - पिवळा.
 8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: कुटुंबात वाद होण्याची दाट शक्यता आहे. वाद-विवाद टाळा. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. मित्रांच्या भेटी होतील. जोडीदारासोबत फिरण्याची योजना आखाल. आजचा शुभ रंग - लाल.
 9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: व्यवसायात भागिदारी करण्यासाठी उत्तम योग आहे. आज उद्योग धंद्यात चांगले यश प्राप्त होईल. मित्रांसोबत बाहेर फिरायला जाल. धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. समाजात तुमच्या कार्याचा गौरव होईल. आजचा शुभ रंग - नारंगी. 
 10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: व्यवसायात असलेल्या स्पर्धेमुळे धावपळ वाढेल. विद्यार्थ्यांना चांगले यश प्राप्त होईल. व्यापाराच्या संदर्भातील कार्यात चांगला लाभ होईल. प्रवासासाठी आजचा दिवस शुभ आहे. आजचा शुभ रंग - हिरवा.
 11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी थोडाचा त्रासदायक जाण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. अशक्तपणा जाणवेल आणि त्यामुळे कार्यातील उत्साह कमी होईल. आजचा शुभ रंग - पिवळा.
 12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: धार्मिक कार्य लवकरच घरता पार पडेल. नोकरी किंवा व्यवसायात काही प्रमाणात वाद होण्याची शक्यता आहे. मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - नारंगी.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी