राशी भविष्य १४ सप्टेंबर : पाहा कशी असेल आठवड्याची सुरुवात

राशी भविष्य, १४ सप्टेंबर २०२० : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

Horoscope
आजचे राशी भविष्य  |  फोटो सौजन्य: Times Now

राशी भविष्य 14 September 2020: कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

 1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: विद्यार्थी आज परीक्षेत यशस्वी राहतील. मीडिया क्षेत्रात कार्यरत व्यक्तींसाठी आजचा दिवस लाभदायक ठरेल. अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात प्रसन्न वातावरण कायम राहील. आरोग्य उत्तम राहील. आजचा शुभ रंग - लाल.
 2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: कार्यालयीन कामात उत्सफुर्तपणे सहभाग घ्याल. कौटुंबिक जीवनात चांगल्या गोष्टी घडतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. आजचा शुभ रंग - पांढरा.
 3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: नोकरीत पदोन्नतीच्या संधी आहेत. अचानक प्रवासाचे योग संभवतात. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. दुसऱ्यांच्या मताचा आदर कराल. खर्च वाढेल मात्र पैसाही हातात खेळता राहील. आजचा शुभ रंग - पिवळा.
 4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: नोकरदार व्यक्ती नोकरीत नव्या संधी शोधण्याचा प्रयत्न करतील. विद्यार्थी परीक्षेत यशस्वी राहतील. व्यवसायिकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. लव लाईफ आनंदी राहील. जोडीदाराच्या सहकार्याने तुम्हाला ऊर्जा प्राप्त होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोवर तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - हिरवा.
 5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: आज वाद होण्याची शक्यता आहे. आरोग्यासंबधी तक्रार जाणवेल. श्री सुन्दरकाण्डचं पठण करा. एखाद्या गरीब व्यक्तीला लाल वस्त्र दान करा. आजचा शुभ रंग - लाल.
 6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: आयटी आणि सिने जगताशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. पैशांचे आगमन होईल. विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी ठरतील. दाम्पत्य जीवन आनंददायी राहील. आरोग्य चांगले राहील. आजचा शुभ रंग - पांढरा.
 7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: काम पूर्ण करण्याचे सर्व प्रयत्न यशस्वी राहतील. आर्थिक प्रगतीसाठी नवीन योजना बनवाल. काम करण्याच्या पद्धतीत सुधारणा होईल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. विरोधकांचा त्रास वाढेल. जोडीदाराशी असलेले मतभेद संपतील. व्यापार, व्यवसाय चांगला चालेल. आजचा शुभ रंग - निळा.
 8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: आज व्यावसायिक व्यक्ती कामामध्ये व्यग्र असतील. आजचा दिवस आनंदाचा असेल. आज लव्ह लाईफ उत्तम असेल. वैवाहिक आयुष्यात रागाला स्थान देऊ नका. श्वसनाचा त्रास होऊ शकतो. आजचा शुभ रंग - निळा. 
 9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: अनपेक्षित धन लाभाची शक्यता आहे. विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी राहतील. प्रेम संबंधासाठी अनुकूल वातावरण आहे. आरोग्य चांगले राहील. हनूमानाची पूजा करा. आजचा शुभ रंग - हिरवा.
 10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: वाद विवादापासून दूर रहा. धनलाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यासाठी आजचा दिवस चांगला असेलं. जोडीदारासाठी आज तुम्ही वेळ काढू शकाल. प्रेमपूर्ण वैवाहिक जीवन तुम्हाला प्रसन्न ठेवलं. आरोग्या उत्तम राहील. आजचा शुभ रंग - हिरवा.
 11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: व्यवसायात उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील. वैवाहिक जीवनात सुख मिळेल. आज तुमची लव्ह लाईफ चांगली राहील. आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात. आजचा शुभ रंग - पांढरा.
 12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: आज तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र आज लव्ह लाईफ उत्तम असेल. आरोग्याची तक्रार जाणवेल. आज प्रवासाचा योग आहे. आज श्री हनुमानचालिसा पठण करा. आजचा शुभ रंग - नारंगी.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी