राशी भविष्य १५ ऑगस्ट: पाहा कसा असेल तुमच्यासाठी हा दिवस

राशी भविष्य, १५ ऑगस्ट २०२० : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

Horoscope
राशी भविष्य  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

 • देशाचा ७४वा स्वातंत्र्य दिन
 • अजा एकादशी
 • पर्युषण पर्वारंभ

राशी भविष्य 15 August 2020: कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

 1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: व्यवसायात यश मिळेल. आध्यात्मिक प्रगती होईल. धार्मिक कार्यात भाग घ्याल. मीडिया तसेच आयटी क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. राजकारणातील व्यक्तींना दिवस चांगला जाईल. लव्ह लाईफ चांगली राहील. शुभ रंग - निळा.
 2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: धनलाभ होईल मात्र, वायफळ खर्च टाळा. नवा व्यवसाय सुरू करण्याची योजना बनवाल. मित्रांच्या सहकार्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित काम पूर्ण होईल. व्यवसायात प्रगतीसाठी अधिक कष्ट करावे लागतील. शुभ रंग - पिवळा.
 3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: धनलाभ झाल्याने आनंदी व्हाल. प्रेमी जोडप्यासाठी दिवस शुभ आहे. वडिलांचा आशीर्वाद घ्या. मुलांना यश प्राप्त होईल. आरोग्याची काळजी घ्यावी लागणार. शुभ रंग - नारंगी.
 4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today:  व्यवसायात धनलाभ होईल. नव्या कार्याची सुरूवात कराल. अविवाहित व्यक्तींच्या विवाह कार्यात येणाऱ्या अडचणी दूर होतील. शुभ रंग - निळा.
 5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे. आयटी, बँकिंग तसेच सिनेमाशी संबंधित व्यक्तींना यश मिळेल. लव्ह लाईफमध्ये चांगली वाटचाल कराल. शुभ रंग - पांढरा.
 6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात अडथळा निर्माण होऊ शकतो. मुलांसोबत वाद होऊ शकतात. रंग शुभ - लाल.
 7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: मन आनंदीत राहील. अधिक भावनिक व्हाल. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. वायफळ खर्च टाळा. रखडलेली कामे पूर्ण होतील. रंग शुभ - पिवळा.
 8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घ्या. तडजोड केल्यास वाद होणार नाही. प्रवास टाळा. लेखक, कलाकार आणि सल्लागारांसाठी दिवस शुभ आहे. नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस उत्तम आहे. शुभ रंग - हिरवा.
 9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: धन लाभ होईल. कुटुंबीयांसह दिवस आनंददायक असेल. भेटवस्तू मिळ्याल्याने आनंद होईल. नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नका. आरोग्याची काळजी घ्या. शुभ रंग - पांढरा.
 10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: धन लाभ होण्याची शक्यता आहे. मनात आनंद आणि उत्साह राहील. करमणूक, सौंदर्यप्रसाधने, दागिने इत्यादी वस्तूंसाठी खर्च कराल. कुटुंबातील व्यक्तींबरोबर आनंदाचे क्षण घालवालं. शुभ रंग- पिवळा.
 11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: कोणाशीही वाद होणार नाही याची काळजी घ्या. आरोग्य बिघडू शकते. विशेषतः डोळ्यांना त्रास होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांबरोबर वाद होण्याची शक्यता आहे. रंग शुभ - लाल. 
 12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: माध्यम आणि आयटी क्षेत्राशी संबंधित लोकांना फायदा होईल. कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस उत्तम आहे. हाती घेतलेले कामे पूर्ण होईल. अविवाहित लोकांच्या मार्गात येणारे अडथळे संपतील. शुभ रंग - पिवळा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी