राशी भविष्य १५ डिसेंबर : असे असेल मंगळवारचे भविष्य

राशी भविष्य, १५ डिसेंबर २०२० : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

horoscope_Rashifal
राशी भविष्य १५ डिसेंबर : असे असेल मंगळवारचे भविष्य  |  फोटो सौजन्य: BCCL

राशी भविष्य 15 December 2020: कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: नवीन कार्याचा शुभारंभ आज करू शकता.  मित्रपरिवारांसोबत पर्यटनस्थळी भेट देण्यास जाऊ शकता. समाजात मान-सन्मान मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आजचा शुभ रंग : पांढरा.
  2.  वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: मित्र-मैत्रीणींच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल.  पर्यटनस्थळी लवकरच भेट देण्यास जाऊ शकता. विवाह करण्यासाठी चांगला योग आहे. आरोग्य निरोगी राहील. आर्थिक लाभ होईल. आजचा शुभ रंग - पिवळा.
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यकारक आहे. आज आर्थिक फायद्यांबरोबरच नशीबाचीही साथ मिळेल. प्रियजनांशी नातेसंबंधात प्रेम वाढेल. नवीन काम सुरू करण्यासाठी वेळ शुभ आहे. प्रवासाचा योग आहे. आजचा शुभ रंग - लाल.
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: आज घरातील गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल. तुम्हाला कामात समाधान मिळेल. महिलांकडून आदर मिळू शकेल. आईशी नातं चांगलं राहील. निराश होऊ नका. आजचा शुभ रंग - पिवळा.
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: आरोग्य उत्तम राहील. अनेक दिवसांपासून रखडलेले काम मार्गी लागेल आणि त्यामुळे तुम्ही आनंदीत व्हाल. नोकरीत यश मिळण्याचे संकेत आहेत. शुभ रंग - पिवळा.
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: मित्रांसोबत नवे कार्य सुरू कराल. खाण्यापिण्यावर तसेच खरेदीवर खर्च कराल. भावूक होण्याचे प्रसंग येतील. आज धनलाभ होण्याची शक्यता आहे. मनात शंका सतावत राहील. पैसे खर्च होतील. आजचा शुभ रंग - पांढरा.
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: आर्थिक लाभ होईल. श्री लक्ष्मीदेवीची कृपा तुमच्यावर राहील. मित्रपरिवारांच्या भेटीमुळे मन प्रसन्न असेल. आरोग्य निरोगी राहील. वायफळ खर्च करणं टाळा. मन स्थिर राहील. शुभ रंग - निळा. 
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना काळजी घ्या. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. मनावर नियंत्रण ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. इतरांशी आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. शुभ रंग - मोरपंखी  
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: नवीन कामाची सुरूवात करू शकता. नोकरीत पदोन्नती होईल. व्यापारात वाढ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. उच्चवर्गीय अधिकाऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल. शुभ रंग - निळा.
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: दिवस आनंदात जाईल. चांगल्या गोष्टींमुळे मन प्रसन्न राहील. मित्र-मैत्रीणींची भेट होईल. घरातील कामात व्यस्त व्हाल. काम-धंद्यात चांगले यश मिळेल. बाहेर फिरायला जाऊ शकता. दाम्पत्यांमध्ये अनुकूल वातावरण राहील. शुभ रंग - जांभळा
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: वायफळ खर्च करणं टाळा. इतरांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. कठीण परिश्रम केल्यानंतर तुमच्या कार्यात यश येईल. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग - निळा.
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: नकारात्मक गोष्टी मनातून दूर करा. प्रवासाला जाताना काळजी घ्या. लेखन आणि साहित्यिक क्षेत्रात गोडी निर्माण होईल. कोणत्याही नवीन कार्याची सुरूवात करू नका. शुभ रंग - हिरवा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी