राशी भविष्य, १५ जुलै २०२० : वृषभ राशीच्यांच्या नोकरीत राहील थोडा तणाव, मेष राशीच्यांनी गाईला द्यावा गूळ

भविष्यात काय
Updated Jul 14, 2020 | 21:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

राशी भविष्य, १५ जुलै २०२० : मेष राशीच्या लोकांसाठी व्यवसायात संघर्ष राहील. वृषभ राशीच्यांनी श्रीसूक्ताचे पठण करावे. जाणून घ्या कसा असेल दिवस.

15 july rashifal in marathi aajche rashi bhavishya
राशी भविष्य, १५ जुलै २०२०  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • मकर राशीच्यांनी नोकरीत परिवर्तनाचे प्रयत्न करावेत.
  • मेष राशीच्या लोकांसाठी व्यवसायात संघर्ष राहील
  • मित्रांच्या मदतीने सिंह राशीच्यांची अनेक कामे होतील

राशी भविष्य 15July 2020: हा दिवस मेष आणि वृषभ राशीच्या लोकांसाठी भाग्याचा आहे. मकर राशीच्यांनी नोकरीत परिवर्तनाचे प्रयत्न करावेत. तूळ राशीचे व्यवसायात प्रगती करतील.

ग्रहांच्या भ्रमणामुऴे कुंभ आणि कन्या राशीच्यांची भरभराट होईल. धनू राशीचे विद्यार्थी नोकरी मिळवण्यात यशस्वी होतील. आता विस्तृत राशी भविष्य जाणून घेऊया.

वाचा 15 जुलैचे राशीभविष्य (Aajche Rashibhavishaya)

मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: आत्मबळ वाढेल. व्यवसायात संघर्ष राहील. तब्येतीबाबत निष्काळजीपणा त्रास देऊ शकतो. गाईला गूळ द्या. शुभरंग: पिवळा आणि पांढरा.

वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: नोकरीत थोडा तणाव राहील. धनाचे आगमन होईल. नव्या योजनांचा विस्तार कराल. शुक्र आणि चंद्र सासरकडून लाभ देऊ शकतात. श्रीसूक्ताचे पठण करा. शुभरंग: निळा.

मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: व्यवसायात सफलता आहे. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. गहू दान करा. अरण्यकांड पठण करा. शुभरंग: निळा.

कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: व्यवसायात सफलता आहे. गुरू आणि चंद्राच्या भ्रमणामुळे नोकरीत सफलता मिळेल. अडलेले काम पूर्ण होईल. अन्नदान करा. शुभरंग: पिवळा.

सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: नोकरीतील सफलतेमुळे खुश राहाल. मित्रांच्या मदतीने अनेक कामे होतील. सूर्याची पूजा करून आशीर्वाद घ्या. मसूर डाळीचे दान करा. शुभरंग: पांढरा.   

कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: बुध मॅनेजमेंट स्किलचा लाभ देईल. ऑफिसच्या कामात व्यस्त राहाल. नोकरीतील सफलतेमुळे खुश राहाल. मित्रांकडून लाभ होईल. सुंदरकांड पठण करा. शुभरंग: निळा.  

तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: भावुक होऊ नका. आरोग्यसुखासाठी तांदूळ दान करा. विद्यार्थ्यांसाठी लाभदायक दिवस आहे. नवीन संधी मिळतील. शुभरंग: हिरवा.

वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: दिवस मंगल आहे. आत्मबळ वाढेल. धनप्राप्तीमुळे खुश राहाल. लाल वस्त्राचे दान करा. हनुमानबाहुक पठण करा. शुभरंग: पिवळा.   

धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: आत्मबलवृद्धीने अनेक कामे होतील. अन्नदान करा. व्यवसायाबाबतचे निर्णय विचार करून घ्या. शुभरंग: पांढरा आणि पिवळा.

मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: व्यवसायात सफलता आहे. विद्यार्थी अभ्यासाला नवीन सकारात्मक दिशा देतील. घरी धार्मिक अनुष्ठान होईल. तांदूळ दान करा. शुभरंग: निळा.

कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: सफलतेचा दिवस आहे. अनेक दिवस अडलेले काम पूर्ण होईल. नोकरीत बदल शक्य आहे. हनुमानबाहुक पठण करा. तिळाचे दान करा. शुभरंग: हिरवा.

मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: नोकरीबाबत खुश राहाल. नात्यांमधील वादांपासून दूर राहा. व्यवसायात सफलता मिळू शकते. सुंदरकांड पठण करा. शुभरंग: लाल.    

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी