राशी भविष्य १५ ऑक्टोबर : असे असेल तुमचे गुरूवारचे राशीभविष्य

राशी भविष्य, १५ ऑक्टोबर २०२० : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य.

15 october 2020 rashifal in marathi aajche rashi bhavishya 12 rashi horoscope
राशी भविष्य १५ ऑक्टोबर  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • मिथुन राशींच्या व्यक्तींनी कोणतेही काम करताना विचारविनिमय करा.
  • कन्या राशींच्या व्यक्तींनी मनावर संयम ठेवा.
  • मकर राशीच्या व्यक्तींना कठिण परिश्रम केल्यानंतर कार्यात यश येईल.

राशी भविष्य 15 October 2020: कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today:  कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. वैचारीकदृष्ट्या गोष्टींमुळे मन स्थिर राहील. दाम्पत्यांमध्ये अनुकूल वातावरण असेल. पर्यटनस्थळी भेट देण्यास जाऊ शकता. सामाजिक कार्यात यश मिळेल. त्यामुळे समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. आजचा शुभ रंग : लाल.
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today:  आरोग्याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रीत होईल. प्रलंबित कामं पूर्ण होतील. वायफळ खर्च होईल. घरातील संपूर्ण कामात लक्ष द्या. आजचा शुभ रंग : नारंगी.
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: कोणतेही काम करताना विचारविनिमय करा. आरोग्याची काळजी घ्या. ऑफिसमधील अधिकाऱ्यांशी मतभेद करू नका. श्री गणेशाची पूजा करा. प्रतिस्पर्धींशी स्पर्धा करू नका. आजचा शुभ रंग : पांढरा. 
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: आजचा दिवस शुभ आहे. मन स्थिर राहील. कुटुंबातील व्यक्तींमध्ये अनुकूल वातावरण राहील. आरोग्य निरोगी राहील. कामा-धंद्यात आणि नोकरीत पदोन्नती होईल. आर्थिक लाभ होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून उत्तम सहकार्य मिळेल. आजचा शुभ रंग : निळा.
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today:   नवीन कार्याचा शुभारंभ आज करू शकता.  मित्रपरिवारांसोबत पर्यटनस्थळी भेट देण्यास जाऊ शकता. समाजात मान-सन्मान मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आजचा शुभ रंग : मोरपंखी
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: मनावर संयम ठेवा. सरकारी कामांपासून दूर रहा. अनपेक्षित खर्च होईल. भगवान श्री गणेशाची पूजा-अर्चना करा. त्यामुळे मनात शांतता राहील. आजचा शुभ रंग : हिरवा.
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. धार्मिक कार्य करण्यासाठी उत्तम दिवस आहे. मित्र-मैत्रीणींच्या भेटीमुळे मन प्रफुल्लित राहील. कुटुंबातील व्यक्तींकडून चांगली बातमी मिळेल. भाऊ-बहिणीचा आशीर्वाद आणि पाठिंबा मिळेल. धनलाभ होईल. आजचा शुभ रंग : पोपटी
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today:  प्रलंबित कामं पूर्ण होतील. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. कामा-धंद्यात वाढ होईल. नोकरीत पदोन्नती होईल. सरकारी कामं पूर्ण होतील. प्रतिस्पर्धींवर विजय मिळवू शकता. आजचा शुभ रंग : बदामी
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: मित्र-मैत्रीणींच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. विवाह करण्यासाठी चांगला योग आहे. आरोग्य निरोगी राहील. लॉकडाऊन संपण्यास सुरूवात होत असल्याने गावी जाण्याचे प्लान तयार होतील.  दाम्पत्यांमध्ये अनुकूल वातावरण राहील. आर्थिक लाभ होईल. आजचा शुभ रंग : जांभळा
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: कठिण परिश्रम केल्यानंतर तुमच्या कार्यात यश येईल. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. वायफळ खर्च करणं टाळा. इतरांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आजचा शुभ रंग : राखाडी
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today:   आरोग्य निरोगी राहील. मनावर नियंत्रण ठेवा. धनलाभ होईल. कुटुंबातील व्यक्तींमध्ये अनुकूल वातावरण राहील. प्रलंबित कामं पूर्ण होतील. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. आजचा शुभ रंग : आकाशी
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: बाहेरील खाद्य-पदार्थ खाणं टाळा. उच्चवर्गीय पदाधिकाऱ्यांकडून उत्तम सहकार्य मिळेल. नकारात्मक विचारांपासून दूर रहा. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग : पांढरा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी