राशी भविष्य १६ सप्टेंबर : असे असेल बुधवारचे भविष्य

राशी भविष्य, १६ सप्टेंबर २०२० : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

16 September 2020 rashifal
राशी भविष्य १६ सप्टेंबर  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • मेष राशीच्या लोकांना मित्रपरिवारांसोबत अनेक दिवसांनी चर्चा होण्याची शक्यता आहे
  • मिथुन राशीच्या लोकांना राजकीय क्षेत्रात  यश मिळाल्यामुळे, तुमचा आत्मविश्वास वाढेल.
  • वृश्चिक राश‍ीच्या व्यक्ती नवीन कामाची सुरूवात आज करू शकता

राशी भविष्य 16 September 2020: कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today:  जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. वैचारीकदृष्ट्या गोष्टींमुळे, मनात चिंता सतावत राहील. मित्रपरिवारांसोबत अनेक दिवसांनी चर्चा होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग : पिवळा.
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today:व्यापारात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. बॅंकिंग आणि मार्केटिंग क्षेत्रातील लोकांना कठिण परिश्रम घ्यावे लागतील. कोणताही महत्त्वाचा निर्णय आज घेऊ नका. आजचा शुभ रंग : नारंगी.
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today:  राजकीय क्षेत्रात  यश मिळाल्यामुळे, तुमचा आत्मविश्वास वाढेल. इतरांशी व्यवहार करताना, काळजी घ्या. आरोग्य निरोगी राहील. विद्यार्थ्यांना शिक्षणात नवीन संधी उपलब्ध होतील. आजचा शुभ रंग : पांढरा. 
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. कोर्ट-कचेरीची प्रलंबित कामं पूर्ण होतील. वैवाहिक जीवन आनंदीत राहील. मित्रपरिवारांसोबत धार्मिकस्थळी भेट देण्यास जाऊ शकता. तुमचा प्रवास सुखाचा होईल. आजचा शुभ रंग : निळा.
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: आज जीभेवर आणि वागण्यावर संयम ठेवा. हितशत्रूपासून सावध रहा. आरोग्याची काळजी घ्या. परदेशात असलेल्या प्रियजनांकडून शुभ वार्ता मिळतील. आजचा शुभ रंग - लाल.
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: नोकरीत पदोन्नती होईल. दाम्पत्यांमध्ये अनुकूल वातावरण राहील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. लेखन आणि साहित्यिक क्षेत्रात तुमची गोडी निर्माण होईल. आजचा शुभ रंग : पांढरा.
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: पोटाचे विकार संभावतील. जीवनसाथीसोबत बाहेर फिरायला जाऊ शकता. मित्र-मैत्रिणींची भेट होईल. लव्ह लाईफ उत्तम राहील. नकारात्मक विचारांपासून दूर रहा. घरातील महत्त्वाच्या कामात व्यस्त व्हाल. आजचा शुभ रंग : हिरवा.
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: नवीन कामाची सुरूवात आज करू शकता. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल. लव्ह लाईफमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सकारात्मक गोष्टींमुळे, मन स्थिर राहील. आजचा शुभ रंग : निळा.
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today:  विद्यार्थ्यांची शिक्षणात प्रगती होईल. व्यापार आणि नोकरीत आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. प्रेमळ व्यक्तीच्या भेटीमुळे, मन प्रसन्न होईल. आरोग्य निरोगी राहील. भगवान श्री गणेशाची पूजा करा. आजचा शुभ रंग : निळा.
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: आजचा संपूर्ण दिवस तुमच्यासाठी संघर्षमय राहील. आयटी आणि बॅंकिंग क्षेत्रातील लोकांना आपल्या कार्यात यश येईल. उच्चवर्गीय पदाधिकाऱ्यांकडून चांगलं सहकार्य मिळेल. अनपेक्षित खर्च करणं टाळा. आजचा शुभ रंग : पिवळा.
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today:वायफळ खर्च करणं टाळा. अनेक दिवसांपासूनची प्रलंबित कामं पूर्ण होतील. कुटुंबात अनुकूल वातावरण राहील. समाजात मान-सन्मान मिळेल. दाम्पत्यांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग : मोरपंखी
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: तुम्हाला राजकीय क्षेत्रात यश येईल. वैवाहिक जीवनात सुख-शांतता राहील. आयटी आणि मीडिया क्षेत्रातील लोकांना नवनवीन संधी उपलब्ध होतील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. लव्ह लाईफ चांगली राहील. आजचा शुभ रंग : पांढरा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी