राशी भविष्य १७ ऑक्टोबर : घटस्थापना, पाहा हा दिवस तुमच्यासाठी कसा

राशी भविष्य, १७ ऑक्टोबर २०२० : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य.

Horoscope
राशी भविष्य 

थोडं पण कामाचं

 • घटस्थापना
 • शारदीय नवरात्रोत्सव प्रारंभ
 • शुभ रंग - करडा

राशी भविष्य 17 October 2020: कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

 1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: दिवस चांगला असेल. मित्रांसोबत आणि कुटूंबासह वेळ घालवाल. धन लाभ होण्याची शक्यता आहे. दिवस भाग्यवान राहील. शुभ रंग - करडा.
 2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: नोकरी व्यवसायात दिवस तुमच्यासाठी स्पर्धात्मक असेल आणि तुम्ही त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. नवीन कार्य सुरू करण्यासाठी प्रेरणा मिळेल. प्रवासाचा योग आहे. लेखनासाठी चांगला दिवस असेल. आरोग्य उत्तम असेल. शुभ रंग - नारंगी.
 3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडू शकते. वायफळ खर्च टाळा. दिवस  तुम्हाला लाभदायक ठरेल. भेटवस्तू मिळू शकतात. रंग शुभ - निळा.
 4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: घरातील गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल. तुम्हाला कामात समाधान मिळेल. महिलांकडून आदर मिळू शकेल. आईशी नातं चांगलं राहील. निराश होऊ नका. शुभ रंग - लाल.
 5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: नवा उद्योग सुरू करण्याचे नियोजन करू शकता. कार्यालयात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी कामाचा ताण अधिक असेल. आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. शुभ रंग - निळा. 
 6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: रागावर नियंत्रण न ठेवल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे. मन शांत ठेवा. बदनामी होणार नाही याची काळजी घ्या. शुभ रंग -पिवळा.
 7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: वाहन चालवताना काळजी घ्या. कोणत्याही प्रकारच्या वादांमध्ये पडू नका. महागड्या वस्तू सांभाळून ठेवा. भावनेच्या भरात कोणतेही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. प्रवासाचा योग आहे. शुभ रंग - पिवळा.
 8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. बाहेरगावी जात असाल तर त्या योजना काही काळासाठी स्थगित कराव्या लागतील. व्यापारात लाभ मिळण्याची शक्यता आहे. शुभ रंग - पांढरा.
 9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: तुम्हाला शुभवार्ता मिळेल. आर्थिक प्रगतीसाठी नव्या योजना बनवाल. समाजसेवेतून कामाचा आनंद घ्याल. इनकम वाढेल. मानसन्मान मिळेल. नव्या भेटीगाठी होतील. शुभ रंग - निळा.
 10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी खूप विचार करा.  मन अस्थिर राहील. वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांत भाग घेवू शकता. शुभ रंग - नारंगी.
 11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: आर्थिक नियोजन चांगले राहील. व्यापारात वाढ होईल. कुटुंबात अनुकूल वातावरण राहील. आर्थिक लाभ होईल. नोकरीत सहकाऱ्यांकडून उत्तम साथ मिळेल. शुभ रंग - पांढरा.
 12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. प्रवास आणि उत्तम आहारासाठी चांगला दिवस आहे. सकारात्मक विचारांमुळे मनात आत्मविश्वास वाढेल. लेखन आणि वाचनात तुमचं लक्ष राहील. वैचारीकदृष्ट्या गोष्टींवर विचारविनिमय करा. समाजात मान-सन्मान मिळेल. शुभ रंग - लाल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी