राशी भविष्य १९ नोव्हेंबर : असा जाईल तुमचा गुरूवार

राशी भविष्य, १९ नोव्हेंबर २०२० : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

19 november 2020 rashifal in marathi aajche rashi bhavishya
राशी भविष्य १९ नोव्हेंबर  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • मेष राशीच्या व्यक्तींचा दिवस संघर्षाचा आहे.
  • सिंह राशीच्या व्यक्तींना नोकरीत वरिष्ठांसोबत वाद होण्याची शक्यता आहे.
  • मकर राशीच्या व्यक्तींनी नोकरीबाबत सावध राहा.

आजचे राशी भविष्य 19 November 2020: कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: दिवस संघर्षाचा आहे. सूर्य आणि चंद्राच्या भ्रमणामुळे नोकरीत प्रगती होऊ शकते. विद्यार्थ्यांना फायदा होईल. गुळाचे दान करा. शुभ रंग - हिरवा.
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: व्यवसायात लाभ देईल. शुक्र, बुध आणि चंद्राच्या भ्रमणामुळे पैसा चांगल्या कामी खर्च होईल. नोकरी आणि व्यवसायात चांगले यश मिळेल. शुभ रंग - पिवळा. 
  3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: नोकरीत परिवर्तनाच्या दिशेने पुढे जाल. वाहन खरेदीचाही योग आहे. आरोग्याची काळजी घ्या. वाहन चालवताना काळजी घ्या. शुभ रंग - पोपटी 
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: हा दिवस भाग्याचा आहे. विद्यार्थ्यांना फायदा होईल. आपले मन धार्मिक कार्यात लागेल. वरिष्ठांच्या आशीर्वादाने कामात चांगले यश प्राप्त होईल. शुभ रंग - नारंगी.   
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: नोकरीत वरिष्ठांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगले यश मिळेल. श्री आदित्यहृदयस्तोत्र पठण करा. मसूर डाळीचे दान करा. शुभ रंग - करडा.       
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: ग्रहांचे भ्रमण आपल्यासाठी अनुकूल आहे. आरोग्यात बुध ग्रहामुळे त्वचाविकार त्रास देऊ शकतात. शंकराची पूजा करा. शुभ रंग - तांबडा.    
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: नात्यांमुळे मानसिक त्रास होऊ शकतो. आर्थिक उन्नतीसाठी श्रीसूक्त पठण करा. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. मित्रांचे चांगले सहकार्य मिळेल. शुभ रंग - आकाशी.
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: व्यवसायात यश मिळेल. मेष राशीचे लोक सहाय्यकारी ठरतील. अन्नदान करा. शुभ रंग - मोरपंखी.   
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: अनेक दिवसांपासून रखडलेले काम मार्गी लागेल आणि त्यामुळे तुम्ही आनंदीत व्हाल. नोकरीत यश मिळण्याचे संकेत आहेत. चण्याच्या डाळीचे दान करा. आरोग्य उत्तम राहील. शुभ रंग - पिवळा.
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: नोकरीबाबत सावध राहा. नात्यांमधील वादांपासून दूर राहा. वाहन खरेदीचाही योग लवकरच निर्माण होईल. बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळा. शुभ रंग - हिरवा.
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: व्यवसायात तणाव निर्माण होऊ शकतात. एखादे धार्मिक अनुष्ठान कराल. उत्तम आरोग्यासाठी बजरंगबाण पठण करा. शुभ रंग - हिरवा.
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: तुम्ही कामात व्यस्त राहाल. चंद्र आणि गुरू प्रत्येक कार्यात यश देतील. नोकरीत वरिष्ठ प्रसन्न राहतील. शुभ रंग - पांढरा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी