Astrology: दोन दिवसांच्या कालावधीमध्ये २ मोठे ग्रह बदलणार राशी; या ४ राशींचे लोक होणार मालामाल

भविष्यात काय
Updated Jun 15, 2022 | 10:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

Venus And Sun Transit In June 2022 । लवकरच सूर्य आणि शुक्राचे राशी परिवर्तन होणार आहे. सूर्यदेव १५ जुन रोजी मिथुन राशीत प्रवेश करतील तर शुक्र देव आपल्या स्वत:च्या वृषभ राशीत संक्रमण करतील.

2 big planets will change in a period of two days, These 4 zodiac signs will benefit
२ दिवसांच्या कालावधीमध्ये २ ग्रह बदलणार राशी, वाचा सविस्तर   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • लवकरच सूर्य आणि शुक्राचे राशी परिवर्तन होणार आहे.
  • सूर्यदेव १५ जुन रोजी मिथुन राशीत प्रवेश करतील तर शुक्र देव आपल्या स्वत:च्या वृषभ राशीत संक्रमण करतील.
  • या दोन ग्रहांच्या संक्रमणाचा मेष या राशीच्या लोकांवर शुभ प्रभाव राहील.

Venus And Sun Transit In June 2022 । मुंबई : लवकरच सूर्य आणि शुक्राचे राशी परिवर्तन होणार आहे. सूर्यदेव १५ जुन रोजी मिथुन राशीत प्रवेश करतील तर शुक्र देव आपल्या स्वत:च्या वृषभ राशीत संक्रमण करतील. या दोन्ही राशींचे संक्रमण काही राशीतील लोकांच्या जीवनात सुख-समृद्धी घेऊन येईल. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य व्यक्तीचे उत्तम आरोग्य, प्रसिद्धी, नाव, सरकारी नोकरी, उच्च पद इत्यादी घटकांचा कारक आहे. तर शुक्र हा सौंदर्य, भौतिक सुख इत्यादींचा कारक मानला जातो. चला तर मग जाणून घेऊया या दोन राशींच्या संक्रमणाचा कोणत्या राशींना फायदा होणार आहे. (2 big planets will change in a period of two days, These 4 zodiac signs will benefit). 

अधिक वाचा : 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये दयाबेनची जोरदार एंट्री

  1. मेष राशी - या दोन ग्रहांच्या संक्रमणाचा मेष या राशीच्या लोकांवर शुभ प्रभाव राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. प्रत्येक गोष्टीत कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल. कुटुंबात कोणतेही शुभ कार्य होऊ शकते. व्यवसायात प्रचंड नफा मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत लाभ मिळण्याच्या नवीन संधी मिळतील.
  2. कर्क राशी - या कालावधीत कर्क राशीतील लोकांचे प्रमोशन होण्याची दाट शक्यता आहे. उत्पन्नातही चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. गुंतवणुकीसाठीही काळ चांगला राहील. कोणतीही अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकते. आर्थिक बाजू मजबूत राहण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला मोठे यश मिळण्याची शक्यता आहे.
  3. सिंह राशी - शुक्र आणि सूर्याचे संक्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रात चांगले यश मिळवून देईल. करिअरमध्ये चांगले यश मिळेल. अचानक कुठूनतरी पैसा मिळू शकतो. कौटुंबिक वातावरण खूप चांगले राहील. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. परदेशात जाण्याचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते.
  4. कन्या राशी - कन्या राशीतील लोकांना समाजात मान-सन्मान मिळेल. प्रवासातून तुम्हाला चांगले लाभ मिळण्याची शक्यता आहे. लव्ह लाईफसाठीही काळ अनुकूल आहे. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. अनेक माध्यमातून पैसे कमावण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी