राशी भविष्य २२ नोव्हेंबर : 'या' राशींच्या व्यक्तींना धनलाभासह मिळणार शुभवार्ता

राशी भविष्य, २२ नोव्हेंबर २०२० : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

Horoscope
राशी भविष्य 

थोडं पण कामाचं

 • मिथुन राशीच्या व्यक्तींच्या कुटुंबात शांती आणि आनंदाचे वातावरण असेल
 • कन्या राशीच्या व्यक्तींचा मित्रपरिवारांसोबत दिवस चांगला जाईल

राशी भविष्य 22 November 2020: कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

 1. मेष राश‍ी भविष्य  / Aries Horoscope Today: इतरांशी व्यवहार करताना किंवा बोलताना लोकांचं बोलणं मनावर घेऊ नका. तुमच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे. थोडीशी अस्वस्थता जाणवेल. मुख्य म्हणजे आहारावर नियंत्रण ठेवा, त्यासाठी मनशांती हा उत्तम मार्ग आहे. शुभ रंग - पिवळा.
 2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: चिंता करणं थोडं कमी करा. तुम्ही खूप भावूक व्हाल. साहित्य, लेखन आणि कलाक्षेत्रांमध्ये तुमचे कार्य लाभदायक ठरणार आहे. कुटुंबातील सदस्यांकडून चांगली साथ मिळेल. दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे. पैशांच्या बाबतीत विशेष लक्ष्य ठेवणं गरजेचं आहे. शुभ रंग - निळा.
 3. मिथुन राश‍ी भविष्य/ Gemini Horoscope Today: सुरूवातीला कामात काही अडचणी येतील. पैशांच्या नियमित व्यवहारामुळे चिंता करण्याची गरज नाही. नोकरीत सहकाऱ्यांची चांगली साथ मिळू शकते. मित्रांना भेटून खूप प्रसन्नता वाटेल. कुटुंबात शांती आणि आनंदाचे वातावरण असेल. शुभ रंग -  लाल.
 4. कर्क राश‍ी भविष्य /  Cancer Horoscope Today: आपल्या मित्रपरिवारांसोबत दिवस खूप चांगला जाईल. त्यांच्याकडून मिळणाऱ्या प्रतिक्रिया तुमच्यासाठी आनंददायक ठरतील. धन लाभ होईल. दिवस तुमच्यासाठी लाभदायक असेल आणि शुभवार्ता मिळेल. शुभ रंग - पांढरा.
 5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: न्यायालयीन कामांसाठी अनुकूल वातावरण असेल. मनात शंका आणि अस्वस्थता जाणवेल. त्यामुळे शारीरिक अवस्थेवर परिणाम होऊ शकतो. व्यवहारात संयम ठेवा. तुम्ही खूप उत्साहित असाल. खर्च वाढतील आणि गैरसमज होण्यापासून सावध रहा. शुभ रंग - हिरवा.
 6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: मित्रपरिवारांसोबत आपला दिवस चांगला जाईल. दाम्पत्यांमध्ये आनंद प्राप्त होईल. आपली पत्नी आणि मुलांना वेळ द्या. जवळच्या प्रेमळ व्यक्तिशी भेट होण्याची शक्यता आहे. शुभ रंग - लाल.
 7. तूळ राश‍ी भविष्य /  Libra Horoscope Today: दिवस तुमच्या कामासाठी लाभदायक असेल. आरोग्य चांगले राहिल. नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस शुभ असेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल आणि सरकारी कामांमध्ये यश मिळेल. शुभ रंग - पिवळा.
 8. वृश्चिक राश‍ी भविष्य  / Scorpio Horoscope Today: शारीरिक रूपातून मनस्थिती थकल्यासारखी जाणवेल. कुठल्याही कार्यात मन लागणार नाही. सहकाऱ्यांकडून नकारात्मक प्रतिक्रिया मिळतील. कोणताही निर्णय घेण्याआधी विचार करावा लागेल, ते तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. शुभ रंग - हिरवा.
 9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: कोणतंही शुभकार्य करण्याआधी चांगले नियोजन करावे लागेल. तुम्ही खूप चिंतीत राहाल. कोणताही निर्णय घेण्याआधी वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या, जेणेकरून तुम्हांला कोणत्याही प्रकाराचा अडथळा येणार नाही. तसंच खर्च वाढण्याची शक्यता आहे. शुभ रंग - पांढरा.
 10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: तुमचा वेळ मनोरंजन आणि इतरांच्या भेटीगाठीसाठी जाईल. धन प्राप्ती होईल. व्यापारातील वेगमर्यादा वाढतील. जीवनशैलीत मान-सन्मान आणि कार्यात मोठे यश मिळेल. शुभ रंग - केशरी.
 11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: कोणत्याही कामात यश मिळण्यासाठी दिवस उत्तम आहे, कामात यश मिळेल. कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. चांगल्या विचारांनी तुम्हांला स्फूर्ती मिळेल. खर्च वाढेल आणि आजारी असलेल्या व्यक्तीच्या तब्येतीत सुधारणा होईल. शुभ वार्ता मिळेल. शुभ रंग - पिवळा.
 12. मीन राश‍ी भविष्य  / Pisces Horoscope Today: दिवस साहित्य, लेखनासाठी उत्कृष्ट आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर होईल. पोट दुखण्याची शक्यता आहे. स्वभावात आणि कामात चांगली प्रगती होईल. मनात शंका आणि भीतीचं वातावरण असेल. मानसिक संतुलनात प्रकृती चांगली ठेवावी लागेल. शुभ रंग - लाल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी