राशि भविष्य २३ जून: पाहा कसा जाईल हा मंगळवार

राशी भविष्य: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

23 june rashifal in marathi aajche rashi bhavishya
आजचे राशि भविष्य २३ जून  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • मेष राशीच्या लोकांना व्यवसाय, व्यापारात कर्क राशीच्या व्यक्तींकडून नवीन व्यवसायाचा प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे
  • कन्या राशीच्या नोकरदारांची प्रगती होण्याची शक्यता आहे.
  • धनु राशीच्या व्यक्तींना एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता ाहे.

राशी भविष्य 23 June 2020: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी आजचा शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस? 

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: व्यवसाय, व्यापारात कर्क राशीच्या व्यक्तींकडून नवीन व्यवसायाचा प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे ज्याला आपण पुढे वाढवण्यात यशस्वी रहालं. नोकरदार व्यक्तींची प्रगती होण्याची शक्यता आहे. आरोग्य उत्तम राहील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - पिवळा.
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today:  विद्यार्थ्यांना नव्या संधी प्राप्त होतील. व्यवसायात यश प्राप्त होण्याची शक्यता आहे. उत्पन्न चांगले राहील. वैवाहिक जीवनात प्रसन्नता कायम राहील. प्रेम संबंधात विवाहाची बोलणी होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - लाल
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today:  धार्मिक कार्याचे नियोजन होण्याची शक्यता आहे. व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. लव्ह लाईफ मध्ये प्रसन्नता कायम राहील. आरोग्य उत्तम राहील. प्रवासाचा योग आहे. आजचा शुभ रंग - हिरवा
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: हा पूर्ण आठवडा राजकीय क्षेत्रातील लोकांसाठी लाभदायक ठरेल. विद्यार्थ्यांना शिक्षणात यश मिळेल. एका वेळेस एकच काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. लक्ष्मीच्या आगमनाने आज तुम्ही आनंदी रहाल. वैवाहीक जीवनात आनंद कायम राहील. आजचा शुभ रंग - निळा
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना नव्या संधी मिळण्याची शक्यता आहे. रखडलेली काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. एखाद्या कर्क आणि धनु राशीच्या व्यक्तीबरोबर व्यापाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील व्यक्ती धेय्य प्राप्त करू शकतील. आजचा शुभ रंग - पिवळा
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today:  नोकरदार वर्गाची प्रगती होण्याची शक्यता आहे. व्यवसायिकांसाठी आजचा दिवस लाभदायक ठरेल. चित्रपट, लेखन क्षेत्रातील व्यक्तींसाठी आजचा दिवस लाभदायक ठरेल. एखाद्या गरीब व्यक्तीला अन्न दान करा. आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. जोडीदाराला वेळ द्या वातावरणात प्रसन्नता कायम राहील. आजचा शुभ रंग - हिरवा
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: आर्थिक उत्पन्न वाढवण्याच्या प्रयत्नांना यश मिळेल. विद्यार्थ्यांना शिक्षणात यश प्राप्त होईल. आनंदी बातमी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी उत्तम योग आहे. आरोग्याच्या समस्या कायम राहतील. खर्च होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - पांढरा
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today:  आज नवीन कल्पना तुमच्या जीवनावर प्रभाव टाकण्याची शक्यता आहे. तुमचा प्रेमळ स्वभाव तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. प्रेमसंबंधात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. शब्दांचा वापर जपून करा. उत्पन्नाचे नवे स्रोत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - लाल
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: एखादी आनंदी बातमी मिळेल. सासरच्या मंडळींचे आगमन होण्याची शक्यता आहे. मीन आणि धनु राशीच्या व्यक्तींची तुम्हाला महत्वाच्या कामात मदत मिळण्याची शक्यता आहे. धनलाभाचे उत्तम योग आहेत. मधुमेह तसेच उच्च रक्तदाबाचा त्रास होण्याची शकतो. आत्मविश्वासात वाढ होईल. आजचा शुभ रंग - हिरवा 
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: प्रवासाचे नियोजन होण्याची शक्यता आहे. तूळ आणि वृषभ राशीच्या व्यक्तीसोबत नवी ओळख भविष्यात लाभदायक ठरू शकते. प्रेम संबंध चांगले राहतील. आई वडीलांचे आशिर्वाद घ्या. आरोग्याच्या समस्या कायम राहण्याची शक्यता आहे. राजकारणी व्यक्तींना यश प्राप्त होण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. आजचा शुभ रंग - निळा
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: 
  12. धनलाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. मीडिया आणि आयटी क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन काम सुरू करण्याचे नियोजन कराल. सुगंधित अत्तराचा वापर करा. एखाद्या मित्राच्या सहाय्याने प्रलंबित प्रशासकीय काम मार्गी लागेल. आजचा शुभ रंग - लाल
  13. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: आज मिथुन आणि वृश्चिक राशीच्या व्यक्तीसोबत बिझनेस डील होण्याची शक्यता आहे. व्यवसायात प्रगतीसाठी मेहनत करा तुम्हाला यश मिळेल. वरिष्ठांच्या मदतीने सरकारी कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. आपला आत्मसन्मान जपण्याची गरज आहे. वडिलांचा आशिर्वाद घेऊन दिवसाची सुरूवात करा यश नक्की मिळेल. आजचा शुभ रंग - पिवळा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी