राशि भविष्य २४ जून: या राशीच्या व्यक्तींचा उच्च अधिकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतो.

राशि भविष्य, २४ जून:: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल हा दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

24 june rashifal in marathi aajche rashi bhavishya
राशि भविष्य २४ जून  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • मेष राशीच्या लोकांचा उच्च अधिकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतो.
  • कर्क राशीच्या व्यक्तींनी रागावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे.
  • धनु राशीच्या व्यक्तींना चिंता आणि अस्वस्थता जाणवेल.

राशी भविष्य 24 June 2020: हा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल हा दिवस? 

मेष राश‍ी भविष्य  / Aries Horoscope Today: उच्च अधिकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतो. वैचारिक स्तरावर नकारात्मक विचारांना स्थान देऊ नका. मानसिकरित्या निरोगी रहाण्याचा प्रयत्न करा. व्यापारी वर्गाला व्यापारात अडथळा येण्याची शक्यता आहे. शुभ रंग - गुलाबी.

वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: शारीरिक आणि मानसिक आरोग्य चागलं राहील. व्यावसायिक क्षेत्रात तुमच्या कार्याचे कौतुक होईल. हा दिवस आनंददायक असेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. मित्रांच्या भेटीगाठी होतील. शुभ रंग - लाल.

मिथुन राश‍ी भविष्य/ Gemini Horoscope Today: हा दिवस आनंदमय असेल. मित्रमंडळींची भेट होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे क्षण घालवाल. पर्यटनस्थळी फिरण्याची शक्यता आहे. नव्या वस्तूंच्या खरेदीवर पैसा खर्च होईल. शुभ रंग - निळा. 

कर्क राश‍ी भविष्य /  Cancer Horoscope Today: रागावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. रागावर नियंत्रण न ठेवल्यास मोठ नुकसान होऊ शकतं. मानसिक चिंता जाणवेल. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होईल. कुटुंबातील व्यक्तींसोबत वाद होऊ शकतो. आरोग्यही बिघडू शकते. शुभ रंग - केशरी.

सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं असेल. घरात सुख-शांती राहील. मित्रमंडळींची भेट होऊ शकते. पर्यटनस्थळी जाण्याची शक्यता आहे. शुभ रंग - निळा.

कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: नव्या कामाची सुरूवात करण्यासाठी हा दिवसही चांगला नाही. आरोग्याची काळजी घ्यावी. मानसिक चिंता जाणवेल. मित्रांसोबत फिरण्याची योजना बनवाल. शुभ रंग -पिवळा.

तूळ राश‍ी भविष्य /  Libra Horoscope Today: मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं असेल. कामात यश मिळेल. कुटुंबातील सदस्यांसह आणि प्रिय व्यक्तींमधील नातं चांगलं राहील. शुभ रंग -पिवळा. 

वृश्चिक राश‍ी भविष्य/Scorpio Horoscope Today: सावधगिरी बाळगावी. बोलण्यावर संयम ठेवल्यास आपण वाद-विवाद टाळू शकता. आईसोबत वाद होण्याची शक्यता आहे. मालमत्ता कागदपत्रांवर काळजीपूर्वक स्वाक्षरी करा. पाण्यापासून दूर रहा. आरोग्याची विशेष काळजी घ्या. शुभ रंग - लाल.

धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today:​ चिंताग्रस्त आणि अस्वस्थता जाणवेल. मित्र आणि मुलांविषयी चिंता राहील. आरोग्याची काळजी घ्या. प्रवास शक्यतो टाळा. शुभ रंग - हिरवा.

मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: धन लाभ होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधण्यास दिवस चागंला आहे. वायफळ खर्च टाळा. जीभेवर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. शारीरिक आरोग्याची काळजी घ्या. शुभ रंग - निळा.

कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: दिवस आनंदात जाईल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधण्यास दिवस चागंला आहे. परदेशात असलेल्या प्रियजनांकडून शुभ वार्ता मिळतील. शुभ रंग - पांढरा.

मीन राश‍ी भविष्य  / Pisces Horoscope Today: दिवस संमिश्र स्वरूपाचा असेल. जीभेवर आणि वागण्यावर संयम ठेवा. रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. शत्रूपासून सावध रहा. शुभ रंग - लाल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी