राशी भविष्य २५ नोव्हेंबर : १२ राशींचे बुधवारचे भविष्य जाणून घ्या

राशी भविष्य, २५ नोव्हेंबर २०२० : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

25 november 2020 rashifal
राशी भविष्य २५ नोव्हेंबर 

थोडं पण कामाचं

 • कर्क राशीच्या आयटी आणि मीडियाशी संबधित लोकांना यश प्राप्त होईल.
 • वृश्चिक राशीच्या व्यक्तींचे पैसे खर्च होतील
 • कुंभ राशीच्या व्यक्तींना व्यवसायाशी संबंधित लोकांना यश मिळेल.

राशी भविष्य 25 November 2020: कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

 1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार कराल. वैवाहिक जीवन उत्तम असेल. प्रेमविवाहाबाबत समस्या उद्भवण्याची शक्यता असल्यानं सावधान राहा. आरोग्य चांगलं राहील. शुभ रंग - हिरवा
 2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: यश मिळल्यानं प्रसन्न असाल. छोट्या छोट्या गोष्टींवरून तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. लव्ह लाईफ उत्तम असेल. आरोग्याची तक्रार जाणवेल. शुभ रंग - नारंगी.
 3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: पैसे अधिक खर्च होण्याची शक्यता आहे. आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील लोकांना यश मिळेल. त्यामुळे आनंदी असाल. वैवाहिक आयुष्यात क्रोधाला स्थान देऊ नका. आरोग्य उत्तम असेल. गरिबांना अन्न दान केल्यास पुण्य मिळेल. शुभ रंग - निळा.
 4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: आयटी आणि मीडियाशी संबधित लोकांना यश प्राप्त होईल. राजकारणी लोकं त्यांच्या कामानं वरिष्ठ नेत्यांना खूश करतील. दिवस प्रेम व्यक्त करण्याचा असेल. आरोग्य उत्तम असेल. पांढऱ्या रंगाचं वस्त्र दान करा. शुभ रंग - आकाशी.
 5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: राजकारणात यश मिळेल. व्यावसायिकांसाठी दिवस प्रगतीशील असेल. मीडिया आणि आयटीशी संबंधित लोक त्यांच्या कामावर समाधानी असतील. वैवाहिक जीवन उत्तम राहील. गायत्री मंत्र वाचा. शुभ रंग - लिंबोळी.
 6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: दिवस यशांनी परिपूर्ण असेल. विद्यार्थ्यांची प्रगती होईल. स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त होईल. धन प्राप्तीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. वैवाहिक जीवन यशस्वी होईल. पैसे खर्च करण्याबाबत चिंतेत असाल. शुभ रंग - जांभळा. 
 7. तूळ राश‍ी भविष्य /  Libra Horoscope Today: तुम्ही तुमच्या कामात आनंदी असालं. वायफळ खर्च होईल. लव्ह लाईफ उत्तम असेल. आरोग्याच्या समस्या जाणवण्याची शक्यता आहे. शुभ रंग - करडा.
 8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: पैसे खर्च होतील. जोडीदाराच्या आरोग्याबद्दल काळजी असेल. एखाद्या गरीब व्यक्तीला लाल वस्त्र दान करा. व्यक्तींना वरिष्ठांनी दिलेले काम वेळेत पूर्ण होईल. शुभ रंग - तपकिरी.
 9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: विद्यार्थ्यांना शिक्षणात यश मिळेल. धार्मिक कार्यात व्यस्त असाल. करमणूक आणि चित्रपट क्षेत्रातील लोकांना नवीन संधी उपलब्ध होतील. राजकारणी लोकांना आपल्या क्षेत्रात यश प्राप्त होईल. लव्ह लाईफ उत्तम असेल. शुभ रंग - पांढरा.
 10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: चित्रपट आणि टीव्ही संबंधित लोकांना यश प्राप्त होईल. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. पैसा खर्च होईल. वैवाहिक आयुष्य आनंददायी राहील. आरोग्य चांगलं राहील. तीळ दान करा. शुभ रंग - पिवळा.
 11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: व्यवसायाशी संबंधित लोकांना यश मिळेल. काही गोष्टींचा तणाव असण्याची शक्यता आहे. लव्ह लाईफमध्ये वाद निर्माण होतील. मधुमेहाच्या रूग्णांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. शुभ रंग - पोपटी.
 12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: दिवस राजकारण्यांसाठी चांगला आहे. राजकारणी लोक यशस्वी होतील. प्रेमाच्या बाबतीत मनातलं बोलण्याची ही उत्तम वेळ आहे. समोरच्या व्यक्तीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवू शकता. आरोग्यासंबधी तक्रार जाणवेल. श्री विष्णू सहस्त्रनाम वाचा. गरिबांना अन्नदान करा. शुभ रंग - मोरपंखी.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी