राशी भविष्य २५ ऑक्टोबर : पाहा यंदाचा दसरा तुमच्यासाठी कसा

horoscope । भविष्य  राशी भविष्य, २५ ऑक्टोबर २०२० : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य.

Horoscope
राशी भविष्य 

थोडं पण कामाचं

  • दसऱ्याचा शुभ दिवस
  • विजय मुहूर्त दुपारी २.१७ पासून ३.०३ वाजेपर्यंत
  • सूर्योदय - सकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी तर सूर्यास्त सायंकाळी ६ वाजून ०५ मिनिटांनी

राशी भविष्य 25 October 2020 : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: आपण नकारात्मक विचारांपासून दूर रहा. वायफळ खर्च करणं टाळा. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबातील व्यक्तींशी बोलताना किंवा व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. शुभ रंग - पांढरा.
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: मनात स्थिरता ठेवावी लागेल. धनप्राप्ती होईल, पण बाहेरील प्रवासामुळे आपला आर्थिक खर्च होऊ शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. सकारात्मक गोष्टींमुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. शुभ रंग - हिरवा.
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: आर्थिक व्यवहार करताना पैशांच्या बाबतीत विशेष लक्ष ठेवणं गरजेचे आहे. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. समाजातील व्यक्तींशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्या.शुभ रंग - पांढरा.
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: मनातली शंका दूर होईल. कोणत्याही नवीन कार्याची सुरूवात करू शकता. इतरांशी व्यवहार करताना मतभेद होणार नाहीत, याची काळजी घ्या. आर्थिक लाभ होईल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रीत होईल. शुभ रंग - हिरवा.
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: नोकरी आणि व्यवसायात स्पर्धात्मक वातावरण राहील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. मनात स्थिरता ठेवा. भाऊ-बहिणींकडून चांगला आशीर्वाद मिळेल. शुभ रंग - पांढरा.
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. दाम्पत्यांमध्ये सुख-शांतीचे वातावरण राहील. धनलाभ होईल. नकारात्मक विचारांपासून दूर रहा. शुभ रंग - निळा.
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: दिवस शुभ आहे. परंतु मनात काही विचार सतावत राहतील. कामा-धंद्यात वाढ होईल. नोकरीत पदोन्नती होईल. बाहेर फिरायला जाऊ शकता. मित्रपरिवारांच्या भेटीमुळे मन आनंदीत राहील. वरिष्ठांकडून चांगले आशीर्वाद मिळतील. शुभ रंग - लाल.
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: प्रवासाच्या योजना बनतील. वैवाहिक जीवनात आनंद कायम राहील. आयटी आणि बॅकिंग क्षेत्रातील लोकांना यशप्राप्ती मिळेल. प्रेम-प्रसंगात वातावरण अनुकूल असेल. आरोग्याच्या समस्या कायम राहतील. शुभ रंग - लाल.
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. नवीन गोष्टी शिकण्याची संधी प्राप्त होईल. रखडलेल्या कामांना गती मिळेल. वैवाहिक जीवनातील प्रेमपूर्ण वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. शुभ रंग - निळा.
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: दिवस तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. धनलाभाची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. शुभ रंग- नारंगी.
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: आर्थिक व्यवहार करताना सावधान रहा. तुमची आई तुमच्यावर खूश होईल. भेटवस्तूवर खर्च होण्याची शक्यता आहे. दिवस तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवण्यासाठी चांगला आहे. शुभ रंग - पिवळा.
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: दिवस चांगला असेल. व्यवसायात यशस्वी व्हाल. सिनेमा आणि प्रसारमाध्यमांच्या लोकांसाठी दिवस हा यशाचा असेल. पैशांचं आगमन निश्चित आहे. शुभ रंग - निळा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी