राशी भविष्य २६ सप्टेंबर : जाणून घ्या १२ राशींचे शनिवारचे भविष्य

राशी भविष्य, २५ सप्टेंबर २०२० : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

26 september 2020 rashifal
राशी भविष्य २६ सप्टेंबर   |  फोटो सौजन्य: BCCL

राशी भविष्य 26 September 2020: कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

 1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: आज समाजात आदर मिळेल. मित्रांची भेट होईल. मित्रांनबरोबर जुन्या गप्पांचा योग आहे. आरोग्य उत्त्म असेल. वैवाहिक जीवन चांगलं राहील.  आजचा शुभ रंग - हिरवा.
 2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. कोणत्याही कामाची सुरूवात आज करू शकता. उच्च पदाधिकाऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल. नोकरीत पदोन्नती होईल. भाऊ-बहिणींकडून चांगले आशीर्वाद मिळतील. आरोग्य निरोगी राहील. प्रतिस्पर्धींवर विजय मिळवू शकता. आजचा शुभ रंग - निळा.
 3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today:  नकारात्मक विचारांमुळे  मनात अस्वस्थता जाणवेल. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे अभ्यासातून लक्ष विचलीत होईल. अनपेक्षित खर्च करणं टाळा. आजचा शुभ रंग - पिवळा.
 4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: मनात चिंता सतावत राहील. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबातील व्यक्तींमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. आर्थिक खर्च होईल. कोर्ट-कचेरीच्या काम-काजापासून दूर रहा. आजचा शुभ रंग - मोरपंखी
 5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: व्यापार आणि नोकरीत पदोन्नती होईल. कुटुंबात अनुकूल वातावरण राहील. बाहेर फिरायला जाऊ शकता. आरोग्य निरोगी राहील. जीवनसाथीच्या प्रेमळ संबंधामुळे जीवनात आनंदप्राप्ती होईल. भाऊ-बहिणींकडून लाभ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग : हिरवा.
 6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: आज धन लाभ होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधण्यास दिवस चागंला आहे. वायफळ खर्च टाळा. जीभेवर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. आजचा शुभ रंग - निळा.
 7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today:आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. शुभ समाचार मिळतील. तीर्थयात्रेसाठी बाहेर फिरायला जाऊ शकता. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नोकरीत पदोन्नती होईल. आजचा शुभ रंगः पिवळा.
 8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today:  आज चुकीची वागणूक तुम्हाला अडचणीत आणू शकते. वाद विवाद होण्याची शक्यता आहे. नवीन काम सुरू करू नये. आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग - हिरवा. 
 9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today:  आज तुम्हाला सामाजिक क्षेत्रात कौतुकास्पद यश मिळेल. प्रिय व्यक्तीला भेटून आनंदित व्हाल. वैवाहिक जीवनात तुम्हाला आनंद आणि समाधान मिळेल. वाणीवर ताबा ठेवा. प्रवासाचा योग आहे. आजचा शुभ रंग - नारंगी.  
 10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today:  आज वायफळ खर्च होऊ शकतो. कुटुंबातील व्यक्तींबरोबर मतभेद होऊ शकतात. शाररिक आणि मानसिक आरोग्य बिघडू शकते. वाद विवाद टाळा.  आजचा शुभ रंग पिवळा.
 11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: आज नोकरीच्या ठिकाणी उच्चवर्गांच्या अधिकाऱ्यांची नाराजी सहन करावी लागेल. व्यवसायात त्रास होईल. मुलांविषयी चिंता राहील. धार्मिक स्थळांना भेट देऊ शकता. वादविवाद टाळा.  आजचा शुभ रंग - जांभळा.
 12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today:  व्यवसायात आजचा दिवस तुमच्यासाठी स्पर्धात्मक असेल आणि तुम्ही त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. नवीन कार्य सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. प्रवासाचा योग आहे.  लेखनासाठी चांगला दिवस असेल. आरोग्य उत्तम असेल. आजचा शुभ रंग - पांढरा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी