राशी भविष्य २७ नोव्हेंबर : असे असेल १२ राशींचे शुक्रवारचे भविष्य

राशी भविष्य, २७ नोव्हेंबर २०२० : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

27 november 2020 rashifal
राशी भविष्य २७ नोव्हेंबर  

थोडं पण कामाचं

  • मेष राशीच्या लोकांचा मित्र-मैत्रीणींच्या भेटीमुळे दिवस आनंदात जाईल.
  • सिंह राशीच्या दाम्पत्यांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे.
  • मीन राशीच्या व्यक्ती धार्मिक कार्यांत व्यस्त व्हाल.

राशी भविष्य 27 November 2020: कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: मित्र-मैत्रीणींच्या भेटीमुळे दिवस आनंदात जाईल. वायफळ खर्च करणं टाळा. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. दाम्पत्यांमध्ये अनुकूल वातावरण राहील. नवनवीन कल्पना सुचवालं. शुभ रंग - पांढरा.
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: नोकरी आणि व्यवसायात पदोन्नती होईल. कामा-धंद्यात वाढ होईल. सरकारी कामात यश मिळेल. समाजात मान-सन्मान मिळेल. प्रलंबित कामं पूर्ण होतील. आरोग्य निरोगी राहील. शुभ रंग - हिरवा.
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: आरोग्याची काळजी घ्या. बाहेरील खाद्य पदार्थ खाणं टाळा. इतरांशी व्यवहार करतांना सावधगिरी बाळगा. राजकीय क्षेत्रातील नागरिकांनी आपली भूमिका मांडताना काळजी घ्यावी. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी विचारविनिमय करा. प्रतिस्पर्धींशी स्पर्धा करू नका. शुभ रंग - निळा.
  4. कर्क राश‍ी भविष्य /  Cancer Horoscope Today: नकारात्मक विचार मनातून दूर करा. बाहेरील खाद्य पदार्थांचे सेवन केल्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. कुटुंबातील व्यक्तींमध्ये मतभेद होतील. वायफळ खर्च करणं टाळा. भगवान श्री गणेशाची पूजा-अर्चना करा, त्यामुळे मन प्रसन्न राहील. शुभ रंग - पिवळा.
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: दाम्पत्यांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील व्यक्तींची काळजी घ्या. जीवनात अपयश येणार नाही, याची काळजी घ्या. नवीन व्यक्तींच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. कोर्ट-कचेरीच्या कामात बिझी राहाल. शुभ रंग - लाल.
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: आरोग्याची काळजी घ्या. घरात सुख-शांतीचे वातावरण असेल. मन प्रसन्न राहील. व्यवसायात मोठे यश प्राप्त होईल आणि आर्थिक लाभ होईल. नोकरीत पदोन्नती होईल. वरिष्ठांकडून उत्तम सहकार्य मिळेल. भगवान श्री गणेशाची पूजा-अर्चना करा. प्रतिस्पर्धींवर विजय मिळवू शकता. शुभ रंग - निळा.
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: प्रेमळ व्यक्तीच्या भेटीमुळे दिवस आनंदात जाईल. मन स्थिर राहील. वैचारीकदृष्ट्या गोष्टींमुळे मन विचलीत होईल. त्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. मनात शांतता ठेवा. शुभ रंग - हिरवा.
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: वैचारीकदृष्ट्या गोष्टींमुळे मनात चिंता सतावत राहील. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबातील व्यक्तींमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. घरातील महत्त्वाच्या गोष्टींबाबत सावधगिरी बाळगा. शुभ रंग - पांढरा.
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. नवीन कार्याची सुरूवात करण्यास दिवस चांगला आहे. लेखन आणि साहित्यिक क्षेत्रांत तुमची गोडी निर्माण होईल. मित्रपरिवारांच्या भेटीमुळे आनंद होईल. भाऊ-बहिणींकडून चांगला आशीर्वाद मिळेल. आर्थिक लाभ होईल. समाजात मान-सन्मान मिळेल. प्रेमळ व्यक्तीची भेट होईल. शुभ रंग - निळा.
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: मनात शांतता ठेवा. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. पैशांच्या बाबतीत विशेष लक्ष ठेवणं गरजेचे आहे. धनलाभ होईल. आरोग्याची काळजी घ्या. नकारात्मक विचार मनातून दूर केल्यामुळे, संपूर्ण दिवस आनंदात जाईल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रीत होणार नाही. शुभ रंग - पांढरा.
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: दिवस शुभ आहे. आरोग्य निरोगी राहील. धनलाभ होईल. आध्यात्मिक गोष्टींचा विचार कराल. मित्र-मैत्रीणींच्या भेटीसाठी दिवस चांगला आहे. शुभ रंग - नारंगी.
  12. मीन राश‍ी भविष्य  / Pisces Horoscope Today: धार्मिक कार्यांत व्यस्त व्हाल. आर्थिक खर्च वाढण्याची शक्यता आहे. मित्र-मैत्रीणींमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. सरकारी कामं पूर्ण करण्याकडे लक्ष द्या. कोर्ट-कचेरीच्या कामापासून दूर रहा. शुभ रंग - लाल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी