राशी भविष्य २८ सप्टेंबर : असे असेल तुमचे सोमवारचे भविष्य

राशी भविष्य, २८ सप्टेंबर २०२० : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य..

Horoscope
राशी भविष्य २८ सप्टेंबर : असे असेल तुमचे सोमवारचे भविष्य  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • कर्क राश‍ीच्या व्यक्तींची नोकरीत पदोन्नती होईल
  • सिंह राशीच्या लोकांनी वायफळ खर्च करणं टाळा
  • वृश्चिक राशीच्या लोकांची प्रलंबित कामं पूर्ण होतील

राशी भविष्य 28 September 2020: कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. धनलाभ होईल. धार्मिक कार्य करण्यासाठी उत्तम दिवस आहे. मित्र-मैत्रीणींच्या भेटीमुळे मन प्रफुल्लित राहील. कुटुंबातील व्यक्तींकडून चांगली बातमी मिळेल. भाऊ-बहिणीचा आशीर्वाद आणि पाठिंबा मिळेल. आजचा शुभ रंग - निळा.
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: आरोग्य उत्तम राहील. अनेक दिवसांपासून रखडलेले काम मार्गी लागेल आणि त्यामुळे तुम्ही आनंदीत व्हाल. नोकरीत यश मिळण्याचे संकेत आहेत. शुभ रंग - पिवळा.
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. राजकारणात यश प्राप्त होईल. गरीबांना अन्न दान करा. शुभ रंग - पिवळा.
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. नोकरीत पदोन्नती होईल. प्रेमळ व्यक्तीच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. भगवान श्री गणेशाची पूजा करा. आरोग्याची काळजी घ्या.  शुभ रंग - लाल.
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: वायफळ खर्च करणं टाळा. इतरांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. कठीण परिश्रम केल्यानंतर तुमच्या कार्यात यश येईल. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग - निळा.
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक उन्नतीसाठी श्रीसूक्त पठण करा.  नात्यांमुळे मानसिक त्रास होऊ शकतो. मित्रांचे चांगले सहकार्य मिळेल. शुभ रंग - लाल.
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: आपले मन धार्मिक कार्यात लागेल. वरिष्ठांच्या आशीर्वादाने कामात चांगले यश प्राप्त होईल. हा दिवस भाग्याचा आहे. विद्यार्थ्यांना फायदा होईल.  शुभ रंग - पिवळा.   
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: प्रलंबित कामं पूर्ण होतील. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. आरोग्य निरोगी राहील. मनावर नियंत्रण ठेवा. धनलाभ होईल. कुटुंबातील व्यक्तींमध्ये अनुकूल वातावरण राहील. आजचा शुभ रंग - हिरवा.
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: शुक्र, बुध आणि चंद्राच्या भ्रमणामुळे पैसा चांगल्या कामी खर्च होईल. व्यवसायात लाभ देईल. नोकरी आणि व्यवसायात चांगले यश मिळेल. शुभ रंग - निळा. 
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: आरोग्याची काळजी घ्यावी लागणार नोकरी करणाऱ्यांना काही अडथळ्यांचा सामाना करावा लागण्याची शक्यता आहे. धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. शुभ रंग - पिवळा.
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: वैवाहिक आयुष्यात सुख प्राप्त होईल.विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात चांगली संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे. जुने मित्र-मैत्रिणींच्या भेटीचा योग निर्माण होईल. शुभ रंग - केशरी.
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: पर्यटनस्थळी लवकरच भेट देण्यास जाऊ शकता.  मित्र-मैत्रीणींच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. विवाह करण्यासाठी चांगला योग आहे. आरोग्य निरोगी राहील. दाम्पत्यांमध्ये अनुकूल वातावरण राहील. आर्थिक लाभ होईल. आजचा शुभ रंग - पिवळा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी