राशी भविष्य ३ नोव्हेंबर : असे असेल तुमचे मंगळवारचे भविष्य

आजचे राशी भविष्य, ३ नोव्हेंबर २०२० : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

Horoscope
राशी भविष्य  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

 • कन्या राशीच्या लोकं नव्या कामाची सुरुवात करु शकतात
 • तूळ राशीच्या लोकांना भाग्याची साथ मिळेल
 • नेतृत्वगुण चांगले असल्याने धनू राशीच्या लोकांना त्याचा फायदा होईल.

आजचे राशी भविष्य 3 November 2020: कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

 1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: आर्थिक स्थिती बिघडू शकते. भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नका. एखाद्या व्यक्तीशी विनाकारण वाद होऊ शकतात. शुभ रंग - लाल.
 2.  वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today:  लव लाईफ आनंदी राहील. जोडीदाराच्या सहकार्याने तुम्हाला ऊर्जा प्राप्त होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोवर तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. सावध रहा. आजचा शुभ रंग हिरवा आहे.
 3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: दाम्पत्यांच्या जीवनात सुख-शांतता राहील. वायफळ खर्च करणं टाळा. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा संपूर्ण दिवस संघर्षमय असेल. आजचा शुभ रंग : पांढरा.
 4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: आज वाद होण्याची शक्यता आहे. आरोग्यासंबधी तक्रार जाणवेल. श्री सुन्दरकाण्डचं पठण करा. एखाद्या गरीब व्यक्तीला लाल वस्त्र दान करा. आजचा शुभ रंग लाल आहे.
 5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. अनपेक्षित खर्च करणं टाळा. समाजात मान-सन्मान मिळेल. बॅंकिंग आणि मीडिया क्षेत्रातील लोकांना आपल्या कार्यात यश मिळेल. आजचा शुभ रंग - नारंगी.
 6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: नव्या कामाची सुरुवात कराल. शुभ वार्ता समजेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची आरोग्याची समस्या सतावू शकते. गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आजचा शुभ रंग - पिवळा. 
 7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: व्यवसायात वाढ होईल. भाग्याची साथ मिळेल. दिवस भरपूर आनंद घेऊन येणारा आहे. एखाद्या लांबच्या प्रवासाचे नियोजन कराल. नवी कामे मिळतील. आरोग्य चांगले राहील. नोकरीमध्ये प्रभाव पडेल. शुभ रंग - पिवळा.
 8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today:  एखाद्याशी दीर्घकाळ चर्चा कराल. एखाद्या गोष्टीवरून आपला मूड खराब करून घेऊ नका. विचारपूर्वक केलेली कामे पूर्ण होतील. प्रेम संबंधांमध्ये यश मिळेल. शुभ रंग - पिवळा.  
 9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: नेतृत्वगुण चांगले असल्याने त्याचा फायदा होईल. आज तुम्हाला यश मिळेल. तुमच्यामध्ये भरपूर आत्मविश्वास असेल. जुनी देणी वसूल होतील. चांगले कार्य हातून घडेल. शुभ रंग - जांभळा.
 10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: प्रलंबित कामं पूर्ण होतील. प्रेमळ व्यक्तीची भेट होईल. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात प्रगती होईल. नवीन कार्याची सुरूवात आज करू शकता. आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग - पांढरा. 
 11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: कार्यालयीन कामात उत्सफूर्तपणे सहभाग घ्याल. कौटुंबिक जीवनात चांगल्या गोष्टी घडतील. आज सफेद रंग लाभदायक ठरेल.
 12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: उच्चवर्गीय पदाधिकाऱ्यांकडून चांगलं सहकार्य मिळेल. प्रेमळ व्यक्तीची भेट होईल. विवाहित जीवनात सुख-शांतता राहील. आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग - लाल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी