राशी भविष्य ३० जून: या राशींच्या व्यक्तींचा आजचा दिवस शुभ

राशी भविष्य, ३० जून:: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

30 june rashifal in marathi aajche rashi bhavishya
आजचे राशी भविष्य ३० जून: या राशींच्या व्यक्तींचा आजचा दिवस शुभ   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • वृषभ राश‍ीच्या व्यक्तींना कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद झाल्यानंतर, मनात अस्वस्थता जाणवेल.
  • कर्क राश‍ीच्या व्यक्तींना आर्थिक खर्च होण्याची शक्यता आहे.
  • सिंह राश‍ीच्या व्यक्तींना उच्च पदाधिकाऱ्यांकडून चांगले सहकार्य मिळेल.

राशी भविष्य 30 June 2020: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी आजचा शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. प्रतिस्पर्धींवर विजय मिळवू शकता. समाजात मान-सन्मान मिळेल. सायंकाळच्या वेळेत आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. इतरांशी वाद घालणं टाळा. आजचा शुभ रंग - हिरवा.
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today:  कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद झाल्यानंतर, मनात अस्वस्थता जाणवेल. बाहेर फिरायला जाणं टाळा. आरोग्य निरोगी राहील. व्यवहार करताना काळजी घ्या. आजचा शुभ रंग - पांढरा.
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today:आरोग्य निरोगी राहील. मित्र-मैत्रीणींची भेट होईल. नकारात्मक विचारांपासून दूर रहा. मनात संयम ठेवा. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - पिवळा. 
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today:  आर्थिक खर्च होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस खूपच चांगला असेल. मित्र-मैत्रीणींच्या भेटीमुळे मनात आनंद निर्माण होईल. भाऊ-बहिणींकडून चांगले आशीर्वाद मिळतील. प्रलंबित कामं पूर्ण होतील. आजचा शुभ रंग - निळा.
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today:उच्च पदाधिकाऱ्यांकडून चांगले सहकार्य मिळेल. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. इतरांशी बोलताना मनावर संयम ठेवा. आजचा शुभ रंग - निळा. 
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: मन स्थिर ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. कोणत्याही नवीन कार्याची सुरूवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. मित्र-मैत्रीणींसोबत अनुकूल वातावरण राहील. प्रत्येक कार्यात यश मिळेल. आर्थिक लाभ होईल. आजचा शुभ रंग - लाल.
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: तुम्हाला विविध क्षेत्रांत यश मिळेल. आरोग्य निरोगी राहील. मित्र-मैत्रीणींच्या भेटी होतील. उच्चवर्गीय पदाधिकाऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद आणि प्रोत्साहन मिळेल. आजचा शुभ रंग - पांढरा.
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today:आरोग्याची काळजी घ्या. आजचा दिवस शुभ आहे. व्यावसायिक क्षेत्रांत वाद होण्याची शक्यता आहे. तुमच्या कार्यात यश मिळेल. आई-वडिलांकडून चांगला आशीर्वाद मिळेल. आजचा शुभ रंग - पिवळा.
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today:  आजचा दिवस शुभ आहे. देवदर्शनासाठी बाहेर फिरायला जाऊ शकता. उच्चवर्गीय अधिकाऱ्यांची उत्तम साथ मिळेल. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. आरोग्य निरोगी राहील. विवाहात अडचणी येणार नाहीत. धनलाभ होईल. आजचा शुभ रंग - हिरवा.
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक खर्च  होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद करू नका. बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळा. इतरांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आजचा शुभ रंग - पांढरा.
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: उच्चवर्गीय पदाधिकाऱ्यांकडून उत्तम सहकार्य मिळेल. दैनंदिन कार्यात विलंब होईल. सामाजिक क्षेत्रात यशप्राप्त होणार नाही. दाम्पत्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग - लाल.
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: कुटुंबात अनुकूल वातावरण राहील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रीत होईल. व्यापारात विघ्न येण्याची शक्यता आहे. कठीण परिश्रम केल्यानंतर तुमच्या कार्यात यश येईल. आजचा शुभ रंग - नारंगी.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी