राशी भविष्य ४ ऑगस्ट: पाहा कसा असेल तुमच्या हा मंगळवार

राशी भविष्य, ४ ऑगस्ट २०२० : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

4 august 2020 rashifal in marathi aajche rashi bhavishya
राशी भविष्य ४ ऑगस्ट:  

थोडं पण कामाचं

 • मेष राशीच्या लोकांना नव्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे
 • कर्क राशीच्या व्यक्तींनी कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद होणार नाही याची काळजी घ्या.
 • धनु राशीच्या व्यक्तींनी उत्तम आहाराचे सेवन केल्यामुळे त्यांचे आरोग्य निरोगी राहील

राशी भविष्य 4 August 2020: कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

 1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: नव्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. भाऊ-बहिण, मित्रांकडून चांगले सहकार्य मिळेल. कठीण परिश्रम केल्यानंतर तुमच्या कार्यात यश येईल. आजचा शुभ रंग - लाल.
 2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: प्रलंबित कामं पूर्ण होतील. कार्यात यश मिळेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. मन शांत राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - नारंगी.
 3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: धार्मिक आणि आध्यात्मिक विचारांत वाढ होईल. व्यवसाय आणि नोकरीत अनुकूल वातावरण राहील. प्रलंबित कामं पूर्ण होतील. नकारात्मक विचारांमुळे मन अस्थिर राहील. पैशांच्या बाबतीत विशेष लक्ष ठेवणं गरजेचे आहे. आजचा शुभ रंग - पांढरा.
 4. कर्क राश‍ी भविष्य /  Cancer Horoscope Today:  कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद होणार नाही याची काळजी घ्या. आरोग्य निरोगी राहील. आर्थिक लाभ होईल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रीत होणार नाही. प्रतिस्पर्धींवर विजय मिळवू शकता. आजचा शुभ रंग - निळा.
 5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: घरातील सदस्यांमध्ये प्रश्न निर्माण होतील. नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. भाऊ-बहिणींकडून संपूर्ण सहकार्य मिळेल. प्रतिस्पर्धींवर विजय मिळवू शकता. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. आहारावर नियंत्रण ठेवा अन्यथा आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. अनपेक्षित खर्च होईल. आजचा शुभ रंग - पांढरा.
 6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: मन प्रसन्न राहील. कुटुंबात ताणतणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते. व्यवहार करताना इतरांशी मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या. सायंकाळ झाल्यानंतर आरोग्यात सुधारणा होईल. लेखन आणि साहित्यिक क्षेत्रांत तुमची गोडी राहील. आजचा शुभ रंग - हिरवा.
 7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today:  काम-धंद्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. धनलाभ होईल. कुटुंबातील व्यक्तींमध्ये अनुकूल वातावरण राहील. आरोग्य निरोगी राहील. सहकाऱ्यांकडून चांगलं सहकार्य मिळेल. आजचा शुभ रंग - निळा.
 8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: व्यापारात वाढ होईल. वायफळ खर्च करणं टाळा. कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेताना विचारविनिमय करा. सासरवाडीतून चांगली बातमी मिळेल. इतरांशी आर्थिक व्यवहार करतांना, मतभेद करू नका. मनावर नियंत्रण ठेवा. कोणत्याही नवीन कामाची सुरूवात आज करू शकता. आजचा शुभ रंग - लाल.
 9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today:  उत्तम आहाराचे सेवन केल्यामुळे, आरोग्य निरोगी राहील. धनलाभ होईल. पैशांचे व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. नोकरी आणि कामा-धंद्यात अनुकूल वातावरण राहील. मनावर संयम ठेवा. नवीन कामाची सुरूवात आज करू शकता. आजचा शुभ रंग - पिवळा.
 10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today:नकारात्मक विचार मनातून दूर करा. आहारावर विशेष लक्ष द्या. प्रवास करताना काळजी घ्या. वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे. साहित्य आणि आध्यात्मिक गोष्टींमध्ये गोडी निर्माण होईल. आजचा शुभ रंग - निळा.
 11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: आरोग्याची काळजी घ्या. व्यावसायिक क्षेत्रांतील नवनवीन विचार मनात निर्माण होतील. प्रतिस्पर्धींशी स्पर्धा करू नका. काम-धंद्यात यश आणि आर्थिक लाभ होईल. नोकरीत पदोन्नती होईल. कुटुंबात अनुकूल वातावरण राहील. गृहस्थजीवनात सुख-शांती राहील. आजचा शुभ रंग - हिरवा.
 12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. श्री गणेशाची पूजा-अर्चना करा. कामा-धंद्यात यश मिळेल. घरात कोणत्याही कार्याचा शुभारंभ आज करू शकता. मोठा आर्थिक लाभ होईल. पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग - पांढरा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी