राशी भविष्य ५ जुलै: जाणून घ्या रविवार तुमच्यासाठी कसा असेल

राशी भविष्य, ५ जुलै २०२० : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

Horoscope
राशी भविष्य 

थोडं पण कामाचं

  • मेष राशीच्या व्यक्तींना नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध होतील
  • कुंभ राशीच्या व्यक्तींनी घाईघाईने निर्णय घेऊ नका
  • धनु राशीच्या व्यक्तींसाठी दिवस तुमच्यासाठी आनंदाचे क्षण घेऊन येणारा असेल

राशी भविष्य 5 July 2020: हा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: रखडलेली कामं पूर्ण होतील. परिणामी अचानक धनलाभ झाल्याने तुम्हाला खूपच आनंद होईल. वाहन चालवताना काळजी घ्या. नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध होतील. शुभ रंग - पिवळा.
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: व्यवसायात मोठा लाभ होऊन धनलाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहील. शुभ रंग - पांढरा.
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: अस्वस्थता जणावेल. भावूक होत काम करू नका. नकारात्मक उर्जेपासून दूर राहा. नात्यात दुरावा येऊ शकतो. कोणतेही काम करताना सावधानता बाळगा. बोलताना विचार करा. शुभ रंग - निळा.
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: व्यवसायात प्रगती कराल. लव्ह लाइफमध्ये ही प्रसन्नता असेल. नव्या नोकरीची संधी चालून येईल. शुभ रंग - निळा.
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: तुमची स्वप्ने पूर्ण होतील. हाती घेतलेले काम नेटाने पूर्ण कराल. दाम्पत्य जीवन सुखी राहील. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. प्रकृती सांभाळा. बाकी दिवस उत्तमच आहे. शुभ रंग - लाल.
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: राजकारणात असलेल्या लोकांना यश मिळेल. धनलाभाचा योग नक्की आहे. वैवाहिक जीवन आनंदी असेल. रिलेशनशिपमध्ये असलेल्या लोकांना विवाह करण्याची योग्य वेळ जवळ आली आहे. शुभ रंग - हिरवा.
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: कोणत्याही नव्या कार्यचा शुभारंभ होण्याची शक्यता आहे. अविवाहीत लोकांना विवाहाच्या मार्गात येणाऱ्या समस्या समाप्त होतील. शुभ रंग - पांढरा. 
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: व्यापारात मोठे यश मिळेल. व्याज, कमिशनमधून भरपूर पैसा येईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे यश मिळेल. आपले आरोग्य जपा. आरोग्याबाबत कोणताही हलगर्जीपणा करू नका. शुभ रंग - पिवळा.
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: दिवस तुमच्यासाठी आनंदाचे क्षण घेऊन येणारा असेल. व्यापारात लाभ होईल. जुनी थांबलेली कामे पूर्ण होतील. नात्यात सुधारणा होईल. नव्या कामाची सुरूवात करू शकता. शुभ रंग - पिवळा. 
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांचा आशीर्वाद मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. बाहेरील खाद्य खाणं टाळा. जुन्या मित्रांच्या कामाच्या निमित्ताने भेट होण्याची शक्यता आहे. शुभ रंग - पांढरा.
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. दिवसभर तुम्ही व्यस्त राहाल. एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करत असाल तर थांबा. घाईघाईने निर्णय घेऊ नका. शुभ रंग - निळा.
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: अध्यात्माकडे कल राहील. विविध क्षेत्रात लाभ मिळण्याची शक्यता आहे. दुसऱ्यांनी दिलेल्या सल्ल्यांचा जरूर विचार करा. विचार करून निर्णय घ्या. शुभ रंग - लाल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी