राशी भविष्य ७ ऑगस्ट: पाहा संकष्ट चतुर्थीचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार

राशी भविष्य, ७ ऑगस्ट २०२० : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

Horoscope
राशी भविष्य  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

 • मेष राशीच्या व्यक्तींसाठी दिवस तुमच्यासाठी शुभ आहे
 • मिथुन राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे
 • कन्या राशीचे व्यक्ती नवीन कामाची सुरूवात करू शकतात

राशी भविष्य 7 August 2020: कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

 1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता. श्रीगणेशाची पूजा करा. कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद होण्याची शक्यता आहे. शुभ रंग - पांढरा.
 2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: नकारात्मक गोष्टी मनातून दूर करा. वाहन चालवताना काळजी घ्या. लेखन आणि साहित्यिक क्षेत्रात गोडी निर्माण होईल. कोणत्याही नवीन कार्याची सुरूवात करू नका. शुभ रंग - हिरवा.
 3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: आर्थिक लाभ होईल. श्री लक्ष्मीदेवीची कृपा तुमच्यावर राहील. मित्रपरिवारांच्या भेटीमुळे मन प्रसन्न असेल. आरोग्य निरोगी राहील. वायफळ खर्च करणं टाळा. मन स्थिर राहील. शुभ रंग - निळा.
 4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना काळजी घ्या. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. मनावर नियंत्रण ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. शुभ रंग - पिवळा.
 5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: दिवस शुभ आहे. मित्र-मैत्रीणींची भेट होईल. प्रलंबित कामं पूर्ण होतील. काम-धंद्यात आर्थिक लाभ होईल. आरोग्य निरोगी राहील. सकारात्मक विचारांमुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. शुभ रंग - लाल.
 6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: नवीन कामाची सुरूवात करू शकता. नोकरीत पदोन्नती होईल. व्यापारात वाढ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. उच्चवर्गीय अधिकाऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल. शुभ रंग - निळा.
 7. तूळ राश‍ी भविष्य /  Libra Horoscope Today: काम-धंद्यात वाढ होईल. वरिष्ठांकडून नोकरी आणि व्यापारात चांगलं सहकार्य मिळण्याची शक्यता फार कमी आहे. लेखन आणि साहित्यिक क्षेत्रात यश मिळेल. कुटुंबातील व्यक्तींकडून चांगली बातमी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. शुभ रंग - हिरवा.
 8. वृश्चिक राश‍ी भविष्य  / Scorpio Horoscope Today: अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता आहे. नवीन कामाची सुरूवात करू शकता. वाद-विवाद टाळा. सरकारी कामात अडथळा येण्याची शक्यता आहे. समाजातील व्यक्तींशी मतभेद करू नका. मनात अस्वस्थता जाणवेल. शुभ रंग - पांढरा.
 9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: दिवस आनंदात जाईल. चांगल्या गोष्टींमुळे मन प्रसन्न राहील. मित्र-मैत्रीणींची भेट होईल. घरातील कामात व्यस्त व्हाल. काम-धंद्यात चांगले यश मिळेल.  दाम्पत्यांमध्ये अनुकूल वातावरण राहील. शुभ रंग - निळा.
 10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: नोकरी आणि काम-धंद्यात वाढ होईल. भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक नियोजन कराल. घरात सुख-शांतीचे वातावरण असेल. आरोग्य निरोगी राहील. प्रलंबित कामं पूर्ण होतील. शुभ रंग - पिवळा. 
 11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: तुमच्या स्वभावात बदल घडून येईल. लेखन, साहित्य आणि कला या क्षेत्रात गोडी निर्माण होईल. त्यामळे मन प्रफुल्लित राहील. कमी झोपेमुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. शुभ रंग - नारंगी.
 12. मीन राश‍ी भविष्य  / Pisces Horoscope Today: कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद करू नका. आरोग्याची काळजी घ्या. वैचारीकदृष्ट्या गोष्टींमुळे मनात चिंता सतावत राहील. काम-धंद्यात नियमित लक्ष द्या. दाम्पत्यांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. वायफळ खर्च करणं टाळा. मन अस्थिर राहील. शुभ रंग - लाल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी