राशी भविष्य ९ जुलै: ‘या’ राशीच्या लोकांसाठी आहे चांगला दिवस

राशी भविष्य 9 July 2020: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी आजचा शुभ रंग काय आहे. जाणून घ्या

9 july rashifal in marathi aajche rashi bhavishya
राशी भविष्य ९ जुलै: ‘या’ राशीच्या लोकांसाठी आहे चांगला दिवस  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

 • कर्क राशीच्या लोकांनी द्यावे मनाच्या एकाग्रतेवर लक्ष
 • वृश्चिक राशीच्यांनी द्यावा गाईला गूळ
 • तणाव आणि क्रोध यांपासून मीन राषीच्यांनी राहावे सावध

राशी भविष्य 9 July 2020: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी आजचा शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस?

आज चंद्र मकर राशीत आहे. आज मकर आणि कुंभ राशीचे लोक व्यवसायात सफलता मिळवतील. मेष आणि वृश्चिक राशीच्या विद्यार्थ्य़ांना नवीन संधी मिळतील. मिथुन आणि कर्क राशीचे लोकांनी आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करणार नाहीत. आता जाणून घेऊया आजचे विस्तृत राशीभविष्य. 

 1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: आज व्यवसायात प्रगतीची अपेक्षा केली जाऊ शकते. मित्रांकडून लाभ होईल. नोकरीच्या संदर्भात काही निर्णयांबाबत गोंधऴ होऊ शकतो. पिवऴा रंग शुभ आहे.
 2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: आजचा दिवस व्यावसायिक यशाचा आहे. विद्यार्थ्यांसाठी काही करण्याचा हा काळ आहे. गृहनिर्माणासाठी पैसा खर्च होऊ शकतो. हिरवा रंग शुभ आहे. श्रीसूक्ताचे पठण करा.
 3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: आज नोकरीमध्ये काही गोष्टींवरून ताण निर्माण होऊ शकतो. नोकरी बदलण्याबाबतचा कुठलाही निर्णय विचार करून घ्या. निळा रंग शुभ आहे. बुध याच राशीत राहून व्यवसायात लाभ देईल.
 4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: आज व्यवसायात लाभ होईल. मनाच्या एकाग्रतेवर लक्ष द्या. घरी धार्मिक विधी होऊ शकतात. पांढरा रंग शुभ आहे. 
 5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today:  कुणाशी वाद घालू नका. नात्यांमधल्या गोडव्यावर लक्ष द्या. लाल रंग शुभ आहे. चंद्र आणि सूर्याच्या भ्रमणाने नोकरीत प्रगती होईल. बजरंगबाणाचे पठण करा.
 6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: मोठ्या भावाच्या मदतीने काही सरकारी कामात यश मिऴेल.  आरोग्य़ाबाबतीत बुध त्वचाविकार देऊ शकतो. श्रीगणेशाची पूजा करत राहा. निळा रंग शुभ आहे. 
 7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: अनेक दिवस अडकलेले सरकारी काम मोठ्या भावाच्या मदतीने पूर्ण होईल. नोकरीसंदर्भात तणाव निर्माण होऊ शकतो. श्रीसूक्ताचे पठण करा. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य मिऴेल. हिरवा रंग शुभ आहे. 
 8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today:मंगळ आणि चंद्र आर्थिक प्राप्तीत वाढ होईल. मेष व धनू राषीचे लोक आज आपल्यासाठी सहाय्यकारी होतील. लाल रंग शुभ आहे. अन्नदान करा. गाईला गूळ खायला द्या. 
 9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: आज कुटुंबात काही बाबतीत तणाव निर्माण होऊ शकतो. आरोग्य उत्तम राहील. वडिलांच्या पायावर डोकं ठेऊन आशीर्वाद घ्या. पिवळा रंग शुभ आहे. आज नोकरीतील कामगिरीमुळे समाधानी राहाल.  
 10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today:  व्यवसायात लाभ होईल आणि लवकरच नवीन व्यावसायिक सौदा कराल. हिरवा रंग शुभ आहे. आज कौटुंबिक वादांपासून दूर राहा. सूर्याची उपासना करा. 
 11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: आज व्यवसायात प्रगती होईल. शनी आणि चंद्राच्या भ्रमणामुऴे नोकरी बदलण्याचे प्रयत्न करू शकता. हनुमानबाहुक पठण करा. हिरवा रंग शुभ आहे. उडीद दान करा.
 12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: आज नोकरीच्या ठिकाणी सहकार्यासोबत वाद होऊ शकतो. तणाव आणि राग यापासून दूर राहा. लाल रंग शुभ आहे. श्रीसूक्ताचे पठण करा. अन्नदान करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी