आजचं राशी भविष्य १३ जून २०२०: जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा

आजचं राशी भविष्य १३ जून २०२०: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल आजचा दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

 13 june 2020 horoscope
आजचं राशी भविष्य १३ जून २०२०: जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा  |  फोटो सौजन्य: BCCL

मुंबई : आजचं राशी भविष्य १३ जून २०२०: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल आजचा दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

 1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today:  मित्रांसोबत फिरण्याची योजना बनवाल. मुलांना अभ्यासात चांगले यश प्राप्त होईल. व्यवसायात धनलाभ होईल. वडीलधाऱ्या व्यक्तींचे आशीर्वाद सोबत असेल. आजचा शुभ रंग - केशरी.

 2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: अतिविचार केल्याने मानसिक त्रास जाणवेल. रागावर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबत चर्चा करा. कुठलाही महत्वाचा निर्णय घेताना विचार करा आणि मगच निर्णय घ्या. आजचा शुभ रंग - पिवळा. 

 3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: श्वसनाचा त्रास जाणवेल. मुलांच्या अभ्यासाची आणि करिअरची चिंता जाणवेल. वायफळ खर्च टाळा. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - पांढरा.

 4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today:  आजचा दिवस तुमच्यासाठी खूपच चांगला आहे. समाजात तुमचा आणि कुटुंबियांचा गौरव होईल. व्यवसायात भागिदारी करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आजचा शुभ रंग - लाल. 

 5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today:  वडिलधाऱ्यांचा चांगला आशीर्वाद मिळेल. नोकरीची उत्तम संधी चालून येईल.  कौटुंबिक आयुष्य आनंदमय असेल. प्रवासाचा योग निर्माण होईल. आजचा शुभ रंग - हिरवा.

 6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today:  कुठलाही व्यवहार करताना विशेष काळजी घ्या. बाहेरील खाद्य-पदार्थ खाणं टाळा आणि आरोग्याची काळजी घ्या. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आजचा शुभ रंग - निळा.

 7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: शारीरिक तसेच मानसिक उत्तम असेल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. व्यवसायात नशिबाची साथ खूपच चांगली मिळेल. आजचा शुभ रंग - पिवळा.

 8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: आपल्या प्रभावशाली वाणीच्या जोरावर नागरिकांची मनं जिंकाल. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होण्याची शक्यता आहे. उत्तम भोजन करण्याची संधी प्राप्त होईल. आजचा शुभ रंग - पांढरा.

 9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: मित्रांची चांगली साथ लाभेल. शुभ कार्याची सुरूवात करण्यासाठी आजचा दिवस खूपच चांगला आहे. कार्यात मिळालेलं यश आणि प्रिय व्यक्तीची मिळालेली साथ यामुळे तुम्ही आनंदीत राहाल. आजचा शुभ रंग - निळा.

 10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today:  पाण्यापासून सावध रहा. परिवार आणि जमिनीशी संबंधित विषयांवर चर्चा करणं टाळा. आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात चांगले यश प्राप्त होईल. नशिबाची साथ चांगली मिळेल. आजचा शुभ रंग - लाल.

 11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: मेहनतीचं योग्य फळ मिळणार नाही. मात्र, तरीही न डगमगता काम करत रहा फळ नक्कीच मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. आजचा शुभ रंग - पिवळा.

 12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: मोठ्या आर्थिक गुंतवणूकीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. धनलाभ होण्याची शक्यता अधिक आहे. मित्रांच्या भेटी होतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आजचा शुभ रंग - केशरी.

 
 
 
 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी