आजचं राशी भविष्य १६ जून २०२०: जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा

आजचं राशी भविष्य १६ जून २०२०: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल आजचा दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

aaj che bhavishya 16 june 2020 today horoscope daily dainik rashifal marathi online free
आजचं राशी भविष्य १६ जून २०२०: जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा  |  फोटो सौजन्य: Times Now
 1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today:   मोठ्या आर्थिक गुंतवणूकीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. धनलाभ होण्याची शक्यता अधिक आहे. मित्रांच्या भेटी होतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आजचा शुभ रंग - केशरी.

 2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: मेहनतीचं योग्य फळ मिळणार नाही. मात्र, तरीही न डगमगता काम करत रहा फळ नक्कीच मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. आजचा शुभ रंग - पिवळा.

 3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: पाण्यापासून सावध रहा. परिवार आणि जमिनीशी संबंधित विषयांवर चर्चा करणं टाळा. आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात चांगले यश प्राप्त होईल. नशिबाची साथ चांगली मिळेल. आजचा शुभ रंग - लाल.

 4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today:  मित्रांची चांगली साथ लाभेल. शुभ कार्याची सुरूवात करण्यासाठी आजचा दिवस खूपच चांगला आहे. कार्यात मिळालेलं यश आणि प्रिय व्यक्तीची मिळालेली साथ यामुळे तुम्ही आनंदीत राहाल. आजचा शुभ रंग - निळा.

 5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today:  आपल्या प्रभावशाली वाणीच्या जोरावर नागरिकांची मनं जिंकाल. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होण्याची शक्यता आहे. उत्तम भोजन करण्याची संधी प्राप्त होईल. आजचा शुभ रंग - पांढरा.

 6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: शारीरिक तसेच मानसिक उत्तम असेल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. व्यवसायात नशिबाची साथ खूपच चांगली मिळेल. आजचा शुभ रंग - पिवळा.

 7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today:  कुठलाही व्यवहार करताना विशेष काळजी घ्या. बाहेरील खाद्य-पदार्थ खाणं टाळा आणि आरोग्याची काळजी घ्या. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आजचा शुभ रंग - निळा.

 8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: वडिलधाऱ्यांचा चांगला आशीर्वाद मिळेल. नोकरीची उत्तम संधी चालून येईल.  कौटुंबिक आयुष्य आनंदमय असेल. प्रवासाचा योग निर्माण होईल. आजचा शुभ रंग - हिरवा.

 9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी खूपच चांगला आहे. समाजात तुमचा आणि कुटुंबियांचा गौरव होईल. व्यवसायात भागिदारी करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आजचा शुभ रंग - लाल. 

 10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today:  श्वसनाचा त्रास जाणवेल. मुलांच्या अभ्यासाची आणि करिअरची चिंता जाणवेल. वायफळ खर्च टाळा. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - पांढरा.

 11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: अतिविचार केल्याने मानसिक त्रास जाणवेल. रागावर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबत चर्चा करा. कुठलाही महत्वाचा निर्णय घेताना विचार करा आणि मगच निर्णय घ्या. आजचा शुभ रंग - पिवळा. 

 12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: मित्रांसोबत फिरण्याची योजना बनवाल. मुलांना अभ्यासात चांगले यश प्राप्त होईल. व्यवसायात धनलाभ होईल. वडीलधाऱ्या व्यक्तींचे आशीर्वाद सोबत असेल. आजचा शुभ रंग - केशरी.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी