Numerology 2022: आपल्या बर्थडेटवरून जाणून घ्या कसे असणार तुमच्यासाठी हे नवे वर्ष

भविष्यात काय
Updated Dec 31, 2021 | 20:10 IST | टाइम्स नाऊ मराठी

Numerology Rashifal 2022: आता नवे वर्ष सुरू होण्यास काही तास उरले आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात जिज्ञासा असते की हे वर्ष त्यांच्यासाठी कसे असणार आहे. जाणून घ्या अंक ज्योतिषाच्या माध्यमातून तुम्हाला कसे जाणार हे वर्ष

numerology
आपल्या बर्थडेटवरून जाणून घ्या कसे असणार तुमच्यासाठी वर्ष 
थोडं पण कामाचं
  • नवे वर्ष सुरू होण्यास काही तास बाकी
  • येणारे वर्ष कसे जाणार सगळ्यांसाठी
  • अंकशास्त्रावरून घ्या जाणून

Numerology 2022: अंक ज्योतिषामध्ये(numerology) अकांच्या आधारावर भविष्यवाणी केली जाते. यानुसार कोणत्याही व्यक्तीच्या जन्मतारखेवरून भविष्य जाणून घेतले जाते. अंक ज्योतिषानुसार(numerology) प्रत्येक अंक कोणत्या ना कोणत्या ग्रहाचे प्रतिनिधित्व करत असतो आणि या कारणामुळे प्रत्येकाचे महत्त्व असते. आता नवे वर्ष(new year) सुरू होण्यास काही तास बाकी आहेत. अशातच प्रत्येकाला असे वाटते की हे वर्ष तुमच्यासाठी कसे जाणार आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये यश-अपयश मिळणार हे समजते. जाणून घ्या अंक ज्योतिषाच्या माध्यमातून नवीन वर्ष कसे जाणार आहे...according to numerology how will be new year for people 

मूलांक १ : ज्य लोकांची जन्मतारीक १, १०, १९ आणि २८ असते त्यांचा मूलांक १ असतो. या मूलांक असलेल्या लोकांची लव्ह लाईफसाठी खास असणार आहे. प्रेमविवाह होण्याची दाट शक्यता आहे. विवाहित व्यक्तींसाठी हे नवे वर्ष अनुकूल असणार आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल तर या वर्षी भाग्याची भरपूर साथ मिळेल. जर तुम्ही व्यापारी आहात तर वर्षाच्या सुरूवातीला तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. काही योजना तुम्हाला चांगली फळे देतील. 

मूलांक २ - ज्या लोकांची जन्मतारीख २, ११, २० आणि २९ आहे त्यांचा मूलांक २ आहे. या वर्षी तुम्ही अधिक भावूक असाल. दाम्पत्य जीवनात या भावूकतेमुळे जोडीदारासोबत त्रास होण्याची शक्यता आहे. तुम्हाला नोकरीत अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना या वर्षात चांगले फरक दिसतील. आधी मेहनत केलेल्या गोष्टींचे फळ मिळेल. नोकरीमध्ये स्थिती मजबूत होईल. 

मूलांक ३ - ज्यांची जन्मतारीख ३,१२, २१ आणि ३० आहे त्यांचा मूलांक ३ आहे. या राशीच्या लोकांना आपल्या उदारतेच्या स्वभावामुळे काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जोडीदारासोबत खटके उडू शकतात. प्रेमसंबंधांसाठी वर्षाची सुरूवात चांगली राहील. लव्ह मॅरेजचे योग बनतात. मेहनतीचे चांगले निकाल मिळतील. व्यापारात वाढ होण्यासाठी तुम्ही सक्षम असाल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षात यश मिळेल.

मूलांक ४ - ज्या लोकांची जन्मतारीख ४,१३, २२ आणि ३१ आहे त्यांचा मूलांक ४ आहे. हा मूलांक असलेल्या व्यक्तींसाठी नवे वर्ष चांगले राहणार आहे. दाम्पत्य जीवनात मधुरता वाढेल. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य लाभेल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी या वर्षी मोठे पदप्राप्ती होऊ शकते. पदोन्नतीच्या मोठ्या संधी आहेत. तुम्हाला मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. व्यापारी वर्गासाठी हे वर्ष लाभदायक सिद्ध होईल. 

मूलांक ५ - ज्या लोकांची जन्मतारीख ५, १४, २३ असते त्यांचा मूलांक ५ असतो. हा मूलांक असलेल्या व्यक्तींसाठी हे नवे वर्ष चांगले जाणार आहे. तुमची सर्व कामे होतील. करिअरमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांमध्ये चढ-उताराचा सामना करावा लागू शकतो. दाम्पत्य जीवनासाठी हे वर्ष अनूकूल राहणार आहे. संतानासंबंधित सुखद बातमी मिळण्याचे योग आहेत. जोडीदारासोबत मिळून जर तुम्ही एखादा व्यापार करत आहात तर जबरदस्त यश मिळू शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी या वर्षी चांगले लाभ मिळतील. 

मूलांक ६ - ज्या लोकांची जन्मतारीख ६, १५ आणि २४ असते त्यांचा मूलांक ६ असतो. हा मूलांक असलेल्या लोकांसाठी नवे वर्ष शुभ सिद्ध होणार आहे. विवाहित लोकांसाठी हे वर्ष चांगले राहील. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी या वर्षी आपली प्रतिभा दाखवण्याची पूर्ण संधी मिळेल. तुम्हाला या वर्षी चांगली नोकरी मिळण्याची संधी आहे. वर्षाच्या उत्तरार्धात चांगली पदोनन्नती मिळू शकते. गुंतवणुकीतून लाभ मिळण्याच्या शक्यता आहेत. 

मूलांक ७ - ज्यांची जन्मतारीख ७,१६ आणि २५ असते त्यांचा मूलांक ७ असतो. नव्या वर्षात तुम्हाला एखाद्या गोष्टीत यश मिळवण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागेल. प्रेमसंबंधीच्या प्रकरणात हे नवे वर्ष कठीण असण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी वर्षाच्या सुरूवातीला मोठे प्रमोशन मिळू शकते. या वेळेचा पूर्ण लाभ उचलाल. हे वर्ष नोकरीत चांगले यश देईल. व्यापारी वर्गाच्या लोकांसाठी थोडे सांभाळून राहणे गरजेचे आहे.. 

मूलांक ८ : ज्या लोकांची जन्मतारीख ८,१७ आणि २६ आहे त्यांचा मूलांक ८ आहे. प्रेमसंबंधींच्या प्रकरणांसाठी नवे वर्ष चांगले राहील. विवाहित लोकांसाठी दाम्पत्य जीवनात मधुरता आणण्यास सवड मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांनी या वर्षी सांभाळून राहावे. वर्षाच्या मध्यम कालावधीत नोकरीच्या काही संधी उपलब्ध होऊ शकतात. काही गुप्त योजना सफल होतील. यामुळे लाभ आणि व्यापारवृद्धीचे मार्ग उघडतील. 

मूलांक ९ - ज्या लोकांची जन्मतारीख ९, १८ आणि २७ आहे त्यांचा मूलांक ९ असतो.  हा मूलांक असलेल्या लोकांना नव्या वर्षात करिअरमध्ये मजबुती मिळेल. वर्षाच्या अंतिम महिन्यात तुम्हाला पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गाच्या लोकांन वर्षा्च्या सुरूवातीस गुंतवणुकीतून चांगले लाभ मिळतील. परदेशी माध्यमातून चांगले काम मिळू शकते. आर्थिक स्थिती चांगली राहील. अनेक माध्यमातून धनप्राप्ती होऊ शकते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी