Horoscope | मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह हा ठरावीक वेळेनंतरच आपली राशी बदलत असतो. तसेच राशी परिवर्तनाच्या या काळात कुठल्यातरी ग्रहाशी योग जुळून येतो. ग्रहांचे हे राशी परिवर्तन काही राशींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ असल्याचे सिध्द होते. हिंदू कॅलेंडरनुसार हिंदू नववर्ष २०७९ ची सुरूवात २ एप्रिलपासून झाली आहे. लक्षणीय बाब म्हणजे या वर्षी संवत्सराचा राजा न्यायदेवता आहे आणि मंत्री देवगुरू बृहस्पतीदेव आहेत. (After 30 years, the people's of Aries and Leo will luck shine).
अधिक वाचा : काश्मिरी पंडितांवर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला
दरम्यान, ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी नवीन वर्षाच्या सुरूवातीला ३० वर्षानंतर शनिदेव आणि सूर्यदेवाचा दुर्मिळ संयोग तयार होत आहे. यावेळी सूर्यदेव शनिची राशी असलेल्या कुंभ राशीत स्थित आहे. तर शनिदेव यावेळेला आपल्या स्वत:च्या राशीत म्हणजेच मकर राशीत विराजमान आहेत. त्यामुळे सूर्य आणि शनिच्या या संयोगाचा प्रभाव या दोन राशींवर दिसून येईल. या २ राशीच्या लोकांचे नशीब बदलणार आहे.
अधिक वाचा : नाशकात मनसे आक्रमक, लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा
मेष राशी - ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीतील लोकांसाठी हा संयोग विशेष फलदायी असल्याचे सिध्द होणार आहे. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. या काळात व्यवसायात फायदा होऊ शकतो. नोकरी करत असाल तर प्रमोशन होण्याची शक्यता आहे. ही संयोग क्रिया फायदेशीर ठरेल. व्यवसायात विस्तार होऊ शकतो तसेच पद प्रतिष्ठा वाढू शकते. लोक तुमचे कौतुक करतील. कामातील बॉस तुमच्या कामावर खुश होतील आणि तुम्ही प्रसन्न व्हाल.
सिंह राशी - सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि शनिचा संयोग शुभ ठरणार आहे. या काळात नशिबाची या राशीतील लोकांना नशीबाची साथ मिळेल. व्यवसायात लाभ होऊ शकतो. या काळात नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. पगारात वाढ होऊ शकते किंवा प्रमोशन होऊ शकते. व्यवसायात गुंतवणुकीसाठी अनुकूल काळ आहे. तसेच तुम्हाला काही अनुभवी लोकांसोबत काम करण्याची संधी मिळेल आणि या काळात तुम्हाला त्यांच्याकडून नवीन गोष्टी शिकायला मिळतील. व्यवसायाशी संबंधित काही प्रवास होण्याचा योग आहे. भविष्यात त्याचा फायदा होईल.