Shukra Transit 2022 : शुक्र देव लवकरच करणार राशीपरिवर्तन, ज्योतिषशास्त्रानुसार या तीन राशींवर पडणार सर्वाधिक प्रभाव

ज्योतिष शास्त्रानुसार वेगवेगळे ग्रह प्रत्येक महिन्यात राशीपरिवर्तन करतात. हिंदु धर्मात प्रत्येक ग्रहाचा आणि देवाचा संबंध जोडलेला आहे. त्याच प्रमाणे शुक्र ग्रह आणि शुक्र देवतेचा संबंध आहे. या महिन्यात शुक्र देव राशीपरिवर्तन होणार आहे

shukra gochar
शुक्र देव लवकरच करणार राशीपरिवर्तन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ज्योतिष शास्त्रानुसार वेगवेगळे ग्रह प्रत्येक महिन्यात राशीपरिवर्तन करतात.
  • हिंदु धर्मात प्रत्येक ग्रहाचा आणि देवाचा संबंध जोडलेला आहे.
  • त्याच प्रमाणे शुक्र ग्रह आणि शुक्र देवतेचा संबंध आहे.

Shukra Gochar 2022:  ज्योतिष शास्त्रानुसार वेगवेगळे ग्रह प्रत्येक महिन्यात राशीपरिवर्तन करतात. हिंदु धर्मात प्रत्येक ग्रहाचा आणि देवाचा संबंध जोडलेला आहे. त्याच प्रमाणे शुक्र ग्रह आणि शुक्र देवतेचा संबंध आहे. या महिन्यात शुक्र देव राशीपरिवर्तन होणार आहे. येत्या २७ एप्रिलला शुक्र देव कुंभ राशीतून निघून मीन राशीत गोचर म्हणजेच परावर्तित होणार आहे. यामुळे तीन राशींवर मोठा प्रभाव पडणार आहे. या राशींच्या व्यक्तींना येणारा काळ शुभ असेल असे सांगण्यात येत आहे. (april 2022 shukra gochar three zodiac sign will affect soon)


एप्रिल महिन्यात शुक्राचे राशीपरिवर्तन

शुक्र राशीपरिवर्तन झाल्याने तीन राशींना त्याचा जास्त प्रभाव जाणवणार आहे. त्याअत पहिली रास आहे कन्या. कन्या राशीच्या व्यक्तींना येणारे दिवस चांगले जाणार आहेत. नोकरीची संधी चालून येणार आहे. तसेच ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यापारात यश मिळणार आहे. 

कन्या राशीनंतर वृषभ राशीच्या लोकांना शुक्रच्या गोचरमुळे फायदा होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुआर वृषभ राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी फायदा होणार आहे. तसेच वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ आरोग्यदायी असणार आहे. 


कन्या आणि वृषभ राशीनंतर कर्क राशीच्या लोकांचे भाग्य उजळणार आहे. कर्क राशीच्या लोकांना शुक्र राशी परिवर्तन शुभ असल्याचे सांगितले जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या कर्क राशीच्या लोकांना प्रवासाचा योग येईल. तसेच व्यापारात लाभ होईल असेही सांगितले जात आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी