As Per Numerology Saturn Is Pleased With Those Born On Specific Dates : न्याय देवता, दंडाधिकारी असे ज्या शनि देवाविषयी म्हणतात ते शनि देव विशिष्ट तारखांना जन्मलेल्या व्यक्तींवर प्रसन्न असतात. अंकशास्त्रानुसार (As Per Numerology) ८, १७ आणि २६ या तारखांना जन्मलेल्या व्यक्तींवर शनि देव प्रसन्न असतात.
अंकशास्त्रात (Numerology) मूलांक हा नेहमी जन्मतारखेच्या आकड्यांच्या बेरेजेतून येणारे अंतिम एक आकडी उत्तर असते. या नियमानुसार ज्यांची जन्मतारीख ८, १७ किंवा २६ यापैकी एक आहे अशा सर्वांचा मूलांक आठ आहे. आठ हा शनि देवाचा मूलांक समजला जातो. यामुळेच ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ८, १७ किंवा २६ यापैकी एखाद्या दिवशी झाला आहे त्यांचा मूलांक आठ असतो आणि त्यांच्यावर शनि देव प्रसन्न असतात.
शनि देव प्रसन्न असल्यामुळे मूलांक आठ असलेले कोणत्याही महिन्याच्या ८, १७ किंवा २६ यापैकी एखाद्या दिवशी (एखाद्या तारखेला) जन्मलेले जीवनात प्रगती करतात. यशस्वी होतात. ही मंडळी प्रामाणिक आणि कष्टाळू असतात. विशिष्ट कामासाठी पूर्ण तयारीनिशी नियोजन करून प्रयत्न करणे यांना आवडते. महत्त्वाचे म्हणजे या मंडळींच्या प्रयत्नांमध्ये सातत्य असते. सत्याची कास धरणे यांना प्रिय असते. अशी सत्याची कास धरलेले मेहनती नागरिक पाहून शनि देव प्रसन्न होऊन त्यांच्यावर कृपादृष्टी करतात.
आठ मूलांक असलेले अनेकदा प्रशासक, पोलीस, न्यायाधीश, बॉस, नेता असतात. जबाबदारीच्या ठिकाणी कामाचे नेतृत्व करतात. मोठ्या जबाबदाऱ्या प्रभावीरित्या हाताळतात. यांचा आत्मविश्वास आणि वागणे बोलणे यांचा इतरांवर प्रभाव पडतो. या मंडळींना अडचणीत सापडलेल्यांना यथाशक्ती मदत करणे आवडते.