Astro Tips to get your money back : उधार दिलेले पैसे परत मिळविण्यासाठी करायचे उपाय

astro tips to get your money back : ज्योतिषशास्रानुसार रखडलेले पैसे परत मिळविण्यासाठी काही उपाय आहेत. मनोभावे हे उपाय केले तर फायदा होऊ शकतो. 

astro tips to get your money back
उधार दिलेले पैसे परत मिळविण्यासाठी करायचे उपाय  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • उधार दिलेले पैसे परत मिळविण्यासाठी करायचे उपाय
  • ज्योतिषशास्रानुसार रखडलेले पैसे परत मिळविण्यासाठी उपाय
  • मनोभावे उपाय केले तर फायदा होऊ शकतो

astro tips to get your money back : अडीअडचणीत आपण अनेकांना तातडीची मदत म्हणून पैसे देतो. पैसे देणे किंवा घेणे यात काहीही चूक नाही. पण पैसे घेणारी व्यक्ती अनेकदा काम पूर्ण झाल्यावर पैसे परत देणे सोयीस्कररित्या विसरते. अशा वेळी पेसे परत मिळवावे कसे असा प्रश्न निर्माण होतो. ज्योतिषशास्रानुसार या बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी निवडक उपाय केले तर उधारीवर दिलेले पैसे लवकर परत मिळण्याची शक्यता वाढते. 

१. रखडलेले पैसे परत मिळविण्याचा उपाय 

ज्योतिषशास्रानुसार रखडलेले पैसे परत मिळविण्यासाठी काही उपाय आहेत. मनोभावे हे उपाय केले तर फायदा होऊ शकतो. 

२. गणपतीची पूजा

दररोज सकाळी आंघोळ करून गणपतीची मनोभावे पूजा केल्यास उधारीवर दिलेले पैसे लवकर परत मिळण्याची शक्यता वाढते. जर आपण कर्ज घेतले असेल तर ते पैसेही लवकर परत करण्याएवढे सक्षम होता.

३. हनुमानाची पूजा

दररोज सकाळी आंघोळ करून हनुमानाची मनोभावे पूजा करावी. हनुमानाला तेल अर्पण करावे. रुईच्या अकरा पानांचा हार अर्पण करावा. नारळ फोडावा. हनुमानाच्या मूर्तीला शेंदूर लेपन करावे. आपल्या उत्पन्नातील ठराविक रक्कम हनुमान मंदिरात यथाशक्ती आणि स्वेच्छेन दान करावी. यामुळे उधारीवर दिलेले पैसे लवकर परत मिळण्याची शक्यता वाढते.

४. गायत्री मंत्र

अनेक महिने किंवा अनेक वर्षांपासून उधारीवर दिलेले पैसे परत मिळाले नसल्यास दररोज सकाळी आंघोळ करून गायत्री मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यामुळे उधारीवर दिलेले पैसे लवकर परत मिळण्याची शक्यता वाढते. गायत्री मंत्राचा मनोभावे नियमित जप करणाऱ्याची प्रगती होते. 

५. सूर्याला अर्ध्य देणे

दररोज सकाळी आंघोळ करून सूर्याला अर्ध्य दयावे. मनोभावे नमस्कार करून मनातील सदिच्छा सांगावी. यामुळे उधारीवर दिलेले पैसे लवकर परत मिळण्याची शक्यता वाढते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी