ज्यांचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे त्यांनी आपल्या राशीनुसार विशिष्ट धातुची भांडी वापरणे लाभाचे आहे. ज्योतिषशास्त्रात कोणत्या राशीच्या व्यक्तींनी कोणते पदार्थ खावे, त्यांना कोणत्या आजाराचा त्रास संभवतो किंवा धोका आहे अशी विविध प्रकारची माहिती विस्तृत स्वरुपात दिली आहे. ज्योतिषशास्त्रातील ग्रह आणि राशी यांचे गुणधर्म विचारात घेऊन राशीनिहाय धातुची भांडी सुचवण्यात आली आहेत. तसेच राशीनुसार तब्येतीची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्योतिषशास्त्र आणि वास्तविकता यांचे संतुलन साधून आपण उत्तम निरोगी आयुष्य जगू शकता.