Numerology: या जन्मतारखेची मुले खूप रोमँटिक मानली जातात, त्यांच्या लाइफ पार्टनरला नेहमी खुश ठेवतात

भविष्यात काय
Updated Feb 07, 2022 | 11:43 IST | टाइम्स नाऊ मराठी

Numerology:अंकशास्त्रानुसार 6, 15 आणि 24 तारखेला जन्मलेल्य व्यक्तींचा भाग्यांक 6 असतो. आणि या व्यक्ती खूप रोमॅण्टिक मानल्या जातात.

Boys of this birth date are considered to be very romantic
या जन्मतारखेला जन्मालेली मुले खूपच रोमँटिक असतात  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अंकशास्त्रानुसार अंक 6 शुक्राच्या प्रभावाखाली आहे.
  • या भाग्यांकाच्या व्यक्ती रोमँटिक आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे असतात.
  • या व्यक्ती आपल्या लाइफ पार्टनरला नेहमी आनंदी ठेवतात.

Venus Planet Effect This Number: अंकशास्त्रानुसार आपल्या जीवनात संख्यांना महत्त्वाचे स्थान आहे. आपण पाहिले असेल की काही संख्या आपल्यासाठी शुभ असते तर काही संख्या अशुभ असते. आजकाल आपला मोबाईल नंबर आणि वाहन क्रमांकसुद्धा आपण खूप विचारपूर्वक निवडतो. तो फक्त तेच आकडे निवडतो जे त्याच्यासाठी शुभ असतात. प्रत्येक जन्म तारखेपासून वेगवेगळ्या भाग्यवान संख्या तयार केल्या जातात


1 ते 9 या अंकांचे वर्णन अंकशास्त्रात उपलब्ध आहे. या संख्येवर कोणत्या ना कोणत्या ग्रहाचे राज्य आहे. आज आपण भाग्यांक 6 बद्दल बोलणार आहोत. भाग्यांक 6 चा स्वामी शुक्र आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा भाग्यांक 6 असतो.

या लोकांचे व्यक्तिमत्व आकर्षक आणि रोमँटिक असते. त्याचबरोबर हे लोक आपल्या बोलण्याने आणि वागण्याने कोणाचेही लक्ष वेधून घेण्यात पटाईत असतात. तसेच शुक्राच्या प्रभावाखाली हे लोक जीवनात खूप नाव आणि पैसा कमावतात. 

रोमँटिक आणि कलाप्रेमी असतात

6 क्रमांकाचा स्वामी शुक्र मानला जातो. जे प्रेम आणि शांतीचे प्रतीक आहे. भाग्यांक क्रमांक 6 असलेले लोक शरीराने मजबूत आणि दिसायला आकर्षक असतात. 
हे लोक रोमँटिक असतात. असे मानले जाते की या लोकांचे वृद्धत्व लवकर दिसत नाही. हे लोक कला आणि मनोरंजन प्रेमी असतात आणि सौंदर्याकडे लवकर आकर्षित होतात. तसेच, ते त्यांच्या पहिल्या भेटीतच कोणालाही आपलेसे करू शकतात. मैत्री जपण्यात हे लोक उत्तम असतात. हे लोक एखाद्याला प्रथमच भेटतात परंतु पूर्ण नम्रतेने भेटतात. हे लोक इतरांच्या दु:खात सोबत उभे असतात. हे लोक आपल्या जोडीदाराला आनंदी ठेवतात.


लॅविश लाईफस्टाईल जगतात या भाग्यांकाच्या व्यक्ती

या लोकांचे शिक्षण चांगले असते. ते त्यांच्या मेहनतीने जीवनात भरपूर पैसाही कमावतात. मात्र आर्थिकदृष्ट्या संपन्न होण्यासाठी त्यांना कष्ट करावे लागतात. त्यांना पैसे खर्च करण्याचीही आवड आहे. तसेच, या लोकांना महागड्या वस्तू घेण्याचा छंद असतो. त्यांना लॅविश जीवन जगायला आवडते. या लोकांना जीवनातील सर्व सुख-सुविधा मिळतात.
लहानपणापासूनच हे लोक आपल्या करिअरचा विचार करायला लागतात आणि यश मिळवण्यासाठी मेहनत करतात. त्यांना प्रवासाची खूप आवड आहे. यासोबतच त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालण्याची आवड आहे.

भाग्यांक 6, 15, आणि 24 भाग्यांकाच्या व्यक्ती भाग्यवान असतात

शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे त्यांना चित्रपट, माध्यम, नाटक, अन्न, वस्त्र, दागिने यांच्याशी संबंधित कामात अधिक यश मिळण्याची शक्यता आहे. यासोबत कपडे, चैनीच्या वस्तू, सोने, चांदी आणि हिरे यांच्याशी संबंधित व्यवसाय त्यांना खूप प्रगती देतो. भाग्यांक 6, 15 आणि 24 असलेल्या व्यक्ती भाग्यवान असतात. तसेच भाग्यांक 2, 3 आणि 9 असणार्‍यांसाठी देखील शुभ आहे. हलका निळा, हलका गुलाबी आणि पांढरा रंग तुमच्यासाठी सर्वात शुभ मानला जातो. हा रंगीत रुमाल तुम्ही नेहमी हातात ठेवू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी