Budh Grah Rashi Parivartan 2022: जुलै पर्यंत या तीन राशींवर असेल बुधदेवाची विशेष कृपा, नोकरीच्या ठिकाणी होईल बरकत, लक्ष्मी होईल प्रसन्न

ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका विशिष्ठ वेळी एका राशीतून दुसर्‍या राशीत गोचर होतो. ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे मेष पासून मीन राशीपर्यंत यावर प्रभाव पडतो. बुध हा पुढील दोन महिने शुक्र राशीच्या वृषभ राशीत गोचर करत राहणार आहे.

budh gochar  2022
बुध गोचर २०२२  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका विशिष्ठ वेळी एका राशीतून दुसर्‍या राशीत गोचर होतो.
  • ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे मेष पासून मीन राशीपर्यंत यावर प्रभाव पडतो.
  • तीन राशींच्या लोकांवर नोकरी आणि व्यवसायात चांगलेच यश मिळणार आहे. 

Budh Grah Rashi Parivartan 2022: मुंबई : ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका विशिष्ठ वेळी एका राशीतून दुसर्‍या राशीत गोचर होतो. ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे मेष पासून मीन राशीपर्यंत यावर प्रभाव पडतो. बुध हा पुढील दोन महिने शुक्र राशीच्या वृषभ राशीत गोचर करत राहणार आहे. बुधच्या या स्थितीचा परिणाम सर्व १२ राशींवर होणार आहे. तर तीन राशींच्या लोकांवर नोकरी आणि व्यवसायात चांगलेच यश मिळणार आहे. 


मेष : मेष राशीच्या लोकांना व्यापारात बुधदेवाची विशेष कृपा असणार आहे. बुधाच्या प्रभावाने अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही नवा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात यश मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना ही वेळ अनुकूल आहे, त्यांच्या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता आहे. 

कर्क :  कर्क राशी असणार्‍यांना ही वेळ अतिशय लाभकारक असणार आहे. यावेळी जर तुम्ही नवीन काम हाती घेणार असाल तर ही वेळ तुमच्यासाठी नक्की फायदेशीर ठरेल. जर तुम्ही नवी जागा किंवा वाहन विकत घेण्याचा विचार करत असाल तर हा व्यवहार तुम्हाला फायदेशीर ठरेल. या काळात धन लाभ होण्याची शक्यता जास्त आहे. कर्क राशीवाल्यांना बुध गोचर शुभ आणि फायदेशीर ठरणार आहे. 

सिंह : सिंह राशी वाल्यांना बुधदेवाची कृपा मिळणार आहे. सिंह राशीच्या लोकांना नोकरीत बढती मिळणार आहे. या गोचर काळात उद्योजकांना चांगलाच नफा होणार आहे. तसेच सिंह राशीच्या लोकांना यश आणि किर्ती प्राप्त होणार आहे.

बुध ग्रहाचा दोष कमी करण्यासाठी उपाय

  1. बुधवारी गायीला चारा द्या, जमल्यास दररोज एक चपाती द्या. 
  2. उडदीच्या डाळीचे सेवन करा आणि दान करा
  3. घराच्या पूर्व दिशेला लाल रंगाचा झेंडा लावावा
  4. बुध दोषापासून मुक्ति मिळवण्यासाठी दुर्गामातेची उपासना करावी
  5. हिरव्या मूग डाळ दान करावी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी