Budhaditya Yog: मुंबई : बुध ग्रहाने शनिवारी (२ जुलै) मिथून राशीत प्रवेश केला आहे. ग्रहांचा राजा सूर्याने आधीच मिथून राशीत गोचर म्हणजेच प्रवेश केला आहे. अशा वेळी बुध आणि सुर्याच्या युतीमुळे बुधादित्य योग आला आहे. सुर्यदेव १५ जुलै पर्यंत मिथून राशीत राहणार आहे. बुधादित्य योगचा प्रभाव सर्व राशींवर पडणार आहे. ज्योतिषशास्त्रात बुधादित्य योग हा शुभ मानला गेला आहे. जाणून घेऊना बुधादित्य योग कुठल्या राशीच्या लोकांना फायदेशीर आहे. (budhaditya yoga in gemini every dream of these zodiac signs will be fulfilled horoscope news in marathi)
बुधादित्य योगमुळे मिथून राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. मिथून राशीच्या लोकांवर लक्ष्मी मातेची कृपा राहणार आहे आणि धनप्राप्ती होणार आहे. उधार दिलेली पैसे परत मिळतील. नवे घर किंवा नवी गाडी घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. यावेळी जोडीदाराचे सहकार्य लाभेल.
बुधादित्य योगमुळे कन्या राशीच्या लोकांचे नशीब उजळणार आहे. अचानक धनलाभ होईल. आत्मविश्वास वाढेल. कुटुंबीयांसोबत चांगला वेळ जाईल. जोडीदारासोबत रोमँटिक वेळ मिळेल. वेळ साथ देईल.
तुळ राशीच्या लोकांना बुधादित्य योगमध्ये अनेक सुख सुविधा मिळतील. उत्पन्न वाढेल, प्रवासाची योजना बनेल. मोठे यश हाती येईल. संपत्तीचा वाद संपुष्टात येईल.
बुधादित्य योगमुळे धनु राशीच्या लोकांना धनलाभ होणार आहे. नोकरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी बढती आणि यश मिळेल. जोडीदारासोबत नाते आणखी घट्ट होईल. वेळेवर कामे पूर्ण होतील आणि ठरवलेल्या योजना पूर्ण होतील. भावांचे सहकार्य लाभेल आणि शत्रू शांत होती.
(विशेष सूचना : सदर माहिती उपलब्ध माहितीवरून संकलित करण्यात आली आहे. टाईम्स नाउ मराठी या माहितीला दुजोरा देत नाही.)